Ambeghar Landslide : एकाच चितेवर 5 जणांना अग्नी

Ambeghar Landslide
Ambeghar Landslideesakal
Updated on

मोरगिरी : डोंगर कपारीत (Satara Ambeghar Landslide) राहणाऱ्या आणि घोंगडे, काठी हे हेच आयुष्य म्हणून दिनक्रम सुरू असलेल्या येथील माणसांनी अनेक घटना, दुर्घटना पाहिल्या; पण ही दुर्घटना थरकाप उडवणारी अन् मन सुन्न करणारी होती. एकाच कुटुंबातील पाच जण एकाच चित्तेवर झोपवून अंत्यसंस्कार केल्याची हृदयद्रावक घटना प्रथमच पाहिली. पंधरा उंबरे असलेल्या गावात फक्त एकच घर शिल्लक राहिले. पती-पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय आणि अन्य नातेवाइकांचा सुरू असलेल्या आक्रोशाने डोळ्यात अश्रू तरळले आणि मदतकार्य करणाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. (Patan Taluka Landslide Funeral Of Five Members Of The Same Family In Ambeghar bam92)

Summary

पाटण तालुक्यातील मोरणा नदीच्या शेजारी वसलेलं तळ आंबेघर हे गाव. आंबेघरमधील कोळेकर कुटुंबावर काळानं घाला घातला आहे.

पाटण तालुक्यातील (Patan Taluka Landslide) मोरणा नदीच्या शेजारी वसलेलं तळ आंबेघर हे गाव. आंबेघरमधील कोळेकर कुटुंबावर काळानं घाला घातला आणि अख्खं कुटुंब संपलं. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास डोंगर भूस्खलन होवून या गावातील 14 ते 16 लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या या गावासाठी ती रात्र काळ रात्र ठरली.‌ चार घरांवर दरड कोसळून या घरातील १५ ते १६ लोक दबले आहेत. दुर्घटनेला 35 तास होऊन गेले, मात्र मदत आणि बचावकार्य सुरु झालं नाही. आसपासच्या गावातील नागरिकांनी या गावात धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. वसंत कोळेकर यांच्या कुटुंबातील सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि अख्ख कुटुंब यांमध्ये उद्ध्वस्त झालं. दिनकर कोळेकर यांचं कुटुंब चिखलात दबलं होतं.

Ambeghar Landslide
भूस्खलनातील बाधित कुटुंबीयांना दहा हजारांची मदत : मंत्री वडेट्टीवार

उत्तम कोळेकर त्यांच्या तीन भावांचं घर मलब्याखाली दबलं. एनडीआरएफच्या जवानांसह मदत कार्यासाठी गुंतलेल्या या ढिगाऱ्याखालून पंधरा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता. या एकाच कुटुंबातील 6 जणांवर असे मिळून अकरा जणांचा वरती अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी सापडलेल्या चार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्यात आल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर एकाच चित्तेवर हे मृतदेह ठेवून अग्नी देण्यात आला. चिमुकल्याचा मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना अश्रू रोखणं कठीण झालं. दुर्घटनेला ३१ तास होऊन गेले होते. मात्र, मदत आणि बचावकार्य सुरु झालं नाही. आसपासच्या गावातील नागरिकांनी या गावात धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. वसंत कोळेकर यांच्या कुटुंबातील सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला. अख्ख कुटुंब यांमध्ये उद्ध्वस्त झाले. दिनकर कोळेकर यांचं कुटुंब चिखलात दबलं होते. पशू पालन हा मुख्य व्यवसाय असल्याने प्रत्येक ‌घराच्या मागे किंवा गोटा होता. त्यावर दरड कोसळून दोन म्हशी दबल्या गेल्या. ‌जवळपास 35 तासांनी या दोन म्हशी बाहेर काढल्या. या म्हशी गाळात रुतल्या होत्या. तिसरा दिवस असल्याने सतरा ते अठरा म्हैसीचा श्वास अखेर मातीत दबला.

Ambeghar Landslide
..अखेर 'NDRF'नं थांबवलं बचाव कार्य; 9 महिन्यांचं बाळ सापडलंच नाही!

गोकुळ गावापासून दोन ते अडीच किलोमीटर चालतच मोरणा-गुरेघर धरणाच्या सांडव्यापर्यंत जावे लागते. तेथून पुढे अडीच ते तीन किलोमीटर डोंगर चढावा लागतो. तळ आंबेघरमधील घटनास्थळी पोहचण्यासाठी असलेला रस्ता ओढ्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे येथून पुढेही तीन ठिकाणी वाहून गेला आहे. पायवाट खूपच निसरडी झालेली. गेल्यावर सर्वत्र केवळ माती आणि गाडले गेलेल्या घरांचे अवशेष दिसत होते. जवळपास 500 ते 600 फूट उंचीची डोंगर रांगच खचली असून ती या ठिकाणी सात घरांवर कोसळली आहे. त्यामध्ये एक होत आंबेघर असेच आता मोठ्या खिन्न मनाने म्हणावे लागेल.

Patan Taluka Landslide Funeral Of Five Members Of The Same Family In Ambeghar bam92

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()