'जनतेच्या पुनर्वसनासाठी जितेंद्र यादवांशी चर्चा करणार'

खासदार संभाजीराजे; कोयनानगरला बाधितांची घेतली भेट
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapatiesakal
Updated on

कोयनानगर (सातारा) : मुसळधार पावसासह भूस्खलनाने (Patan Taluka Landslide) कोयना विभागाची भरून न येणारी हानी झाली आहे. भूस्खलन भागातील जनतेचे अन्यत्र पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिली. वन विभागाची बफर झोनमधील चांगली जमीन सातारा, सांगली जिल्ह्यांत असल्यास बाधितांचे पुनर्वसन करता येईल का, त्यासाठी केंद्रीय वनराज्यमंत्री जितेंद्र यादव (Minister Jitendra Yadav) यांच्याशीही चर्चा करू, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (Patan Taluka Landslide MP Sambhajiraje Chhatrapati Visit To Koynanagar bam92)

Summary

मुसळधार पावसासह भूस्खलनाने (Patan Taluka Landslide) कोयना विभागाची भरून न येणारी हानी झाली आहे.

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati

कोयना विभागातील भूस्खलग्रस्त मिरगाव व बाजेतील लोकांची येथील मराठी शाळेत खासदार संभाजीराजेंनी भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, सभापती राजाभाऊ शेलार, सत्यजित शेलार, संपत जाधव, सचिन कदम उपस्‍थित होते. खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘निसर्गाने कोयना विभागावर काळाचा घाला घातला आहे. त्‍यामुळे कोयना विभागावर आलेले संकट मोठे आहे. कोयना विभागाची अपरिमित हानी झाली आहे. पुनर्वसनाबाबत वन विभागाच्या पुणे, रायगड, सोलापूर येथील चांगल्या जमिनीवर बाधितांचे पुनर्वसन करणे शक्य आहे. त्या पर्यायाचा विचार करण्यात यावा. केंद्रीय वनराज्यमंत्री जितेंद्र यादव यांच्याबरोबर चर्चा करून हा विषय तडीस नेऊ.’

Patan Taluka Landslide MP Sambhajiraje Chhatrapati Visit To Koynanagar bam92

Sambhajiraje Chhatrapati
फलटणमध्ये शिवसेना वाढीसाठी लक्ष घालणार: शंभूराज देसाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.