मोरगिरी (सातारा) : भूस्खलनात आंबेघर (Satara Ambeghar Landslide) गावातील तब्बल १७ जण गाडल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यापैकी काल १२ जणांचे तर आज आणखी चौघांचे मृतदेह शोधण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. अद्यापही एक लहान मुलगा बेपत्ता आहे. लक्ष्मण विठ्ठल कोळेकर, दिनकर विठ्ठल कोळेकर, हिराबाई दिनकर कोळेकर अशी तिघांची ओळख पटली आहे, तर अन्य एकाची ओळख पटलेली नाही. आणखी एका लहान बाळाचा शोध सुरू होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याला शोधता आले नाही. रात्री अंधारामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. मुंबईकर चाकरमानी घरी आल्यानंतर गावातील घरासहीत संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहून त्यांचाही आक्रोश हृदय पिळवटणारा होता. (Patan Taluka Landslide NDRF Team Succeeds In Finding 6 Dead Bodies At Ambeghar Mirgaon bam92)
मुंबईकर चाकरमानी घरी आल्यानंतर गावातील घरासहीत संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहून त्यांचाही आक्रोश हृदय पिळवटणारा होता.
आंबेघरातून दिवसभरात चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला आज यश आले. पावसामुळे तुटलेल्या रस्त्यामुळे जेसीबीसहीत कसलीच मदत पोचू शकत नव्हती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि एनडीआरएफच्या पथकाने (NDRF Team) बिकट स्थितीत खोरे आणि पाट्या घेऊन मृतदेह बाहेर काढले. आज बाराच्या सुमारास पोकलेन मशिन जागेवर पोचल्याने बचाव कार्यास वेग आला. बचाव पथकाला चार मृतदेह शोधण्यात यश आले. शुकवारपासून आंबेघरावर भूस्खलनाचे संकट आहे. त्यात तब्बल १७ जण गाडल्याची भीती व्यक्त होत आहे. चार कुटुंबांतील सदस्यांची युद्धपातळीवर शोध मोहीम आजही तिसऱ्या दिवशी सुरू होती. काल दिवसभरात १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. संध्याकाळी अंधारामुळे शोध मोहीम थांबवली होती. आज सकाळी पुन्हा शोध मोहिमेचे काम सुरू झाले.
दिवसभरात चार मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. आजअखेर पाच पुरुष, सात महिला तर तीन लहान बालकांचे मृतदेह सापडले आहेत. वसंत कोळेकर यांच्या कुटुंबातील सहा व्यक्ती मृत झाल्याने कुटुंबच संपले आहे. गावातील मुंबईकर चाकरमानी घरी आल्यानंतर गावात घर नसल्याचे पाहून कुटुंबांचा आधार हरवल्याचे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. आंबेघरात मदत मिळावी म्हणून रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. खचलेल्या ठिकाणी भराव टाकून रस्ता करण्याचे काम सुरू होते. गर्दी होऊ नये यासाठी धावडे गावाजवळ पोलिस बंदोबस्त होता. आरोग्य, पोलिस प्रशासन, महसूल विभाग परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. बचाव कार्यात पावसामुळे व्यत्यय येत होता. परंतु, एनडीआरएफचे पथकाकडून शोध मोहीम सुरूच होती. गावात फक्त एकच घर शिल्लक आहे. जनावरे घराखाली गाडली गेल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
अथक परिश्रमाने नेले पोकलेन
अथक प्रयत्न करून घटनास्थळी पोकलेन मशिन आणले. सुनील माथणे यांनी ते पोकलेन चालवत ती कसरत केल्याने बचावकार्यास गती आली. खडतर डोंगरातून त्यांनी मशिन नेल्याने मदतकार्यास वेग आला. संदीप कोळेकर, संपतशेठ कोळेकर, किसन गालवे यांच्याबरोबर मुंबईकर तरुण युवकांनी सहकार्य केले. त्यामुळे खोरे आणि पाट्या घेऊन काम करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकला हातभार लागला.
आंबेघरला चार तर मिरगावला दोन मृतदेह सापडले
आंबेघर, मिरगाव येथे झालेल्या भूस्खलनात गाडलेल्यांसाठी मदतकार्य आजच्या तिसऱ्या दिवशीही अखंडपणे सुरू होते. आंबेघर येथे चौघांचे तर मिरगाव येथून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. पावसामुळे तुटलेला रस्ता अडचण आणत होता. मात्र, तरीही आंबेघर, मिरगावात जेसीबी, पोकलनेच्या साह्याने मदतकार्य सुरू होते. स्थानिक ग्रामस्थांसहीत एनडीआरएफच्या पथकाने दिवसभर शर्थीचे प्रयत्न करत मृतदेह शोधले. मिरगावचे अद्यापही दोघे, तर आंबेघर येथे एक लहान मुलगा बेपत्ता आहे. त्यांचे शोधकार्य सुरू होते. अत्यंत बिकट परिस्थितीत खोरे आणि पाट्या घेऊन मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
Patan Taluka Landslide NDRF Team Succeeds In Finding 6 Dead Bodies At Ambeghar Mirgaon bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.