पोलिस पाटील गावकऱ्यांसाठी ठरले 'देवदूत'

Patan Taluka Landslide
Patan Taluka Landslideesakal
Updated on

मिरगाव (सातारा) : भूस्खलनात पाटण तालुक्यातील (Patan Taluka Landslide) कोयनानगर परिसरातील मिरगाव (Mirgaon Landslide) येथील अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. दुर्घटनेपूर्वी तेथील ग्रामस्थांना वाचवण्यासाठी मिरगाव येथील पोलिस पाटील सुनील शेलार (Police Patil Sunil Shelar) यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. रात्री साडेदहा वाजता सर्व नागरिकांना त्यांनी घराबाहेर पडण्यासाठी घरोघरी जाऊन आवाहन केले. त्यामुळे गावातील पन्नास ते साठ लोकांचे जीव वाचले आहेत. त्यामुळे मिरगावचे पोलिस पाटील हे गावकऱ्यांसाठी देवदूतच ठरले आहेत. (Patan Taluka Landslide Police Patil Of Mirgaon Saved The Lives Of The Citizens bam92)

Summary

मुसळधार पावसाचे आगार असणाऱ्या कोयनानगर परिसरात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

मुसळधार पावसाचे आगार असणाऱ्या कोयनानगर परिसरात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain in Koynanagar) कोसळत होता. त्यामुळे कोयनानगर परिसरातील डोंगराकडेच्या तीन गावांत भूस्खलन झाले. त्यामध्ये मिरगाव, ढोकावळे या गावांना त्याचा मोठा फटका बसला. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मिरगाव या डोंगराकडे वसलेल्या गावावर मृत्यूने झडप घातली. त्यामुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. गुरुवारी दुपारी तीन वाजता थोडेसे भूस्खलन झाले होते. मात्र, नागरिकांनी ते गांभीर्याने घेतले नाही. त्याची पूर्वसूचना ओळखून गावचे पोलिस पाटील सुनील शेलार यांनी गावकऱ्यांना सावध राहण्यास सांगितले होते. रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास जेवण केल्यानंतर सुनील शेलार हे घरातून गावातून फेरफटका मारायला गेल्यावर त्यांना मोठा आवाज झाल्याचे ऐकू आले. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पळतपळत गावातील घरोघरी जाऊन लोकांना बाहेर पडा, बाहेर पडा, असे सांगत ते गावभर फिरले. अनेकांनी त्यांची सूचना ऐकून लोक बाहेर पडले. मात्र, काहीजण घरातच बसले.

Patan Taluka Landslide
Satara Rain: साताऱ्यात अतिवृष्टीने दरड कोसळून ३७ जणांचा मृत्यू
Mirgaon Landslide
Mirgaon Landslide

दरम्यान, पोलिस पाटील यांनी स्वतःच्या कुटुंबीयांबरोबरच गावातील सुमारे पन्नास ते साठ लोकांना बाहेर काढले आणि रस्त्यावर आणले. त्यामुळे त्यांचे जीव वाचले. मात्र, काही ज्येष्ठ नागरिक, महिला यांना घराबाहेर तातडीने पडता आले नाही. त्याचबरोबर काही लोकांनी पोलिस पाटील यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सुमारे बारा लोक गाडले गेले. पोलिस पाटील यांच्यामुळे संबंधित गावच्या भूस्खलनात गाडले गेलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. गावचा पोलिस पाटील कसा असावा, याचे आदर्श उदाहरण सुनील शेलार यांनी घालून दिले आहे. त्यांनी स्वतःबरोबरच गावकऱ्यांचे हे जीव वाचवले. त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे गावातील सुमारे पन्नास ते साठ लोकांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. मिरगावकरांसाठी शेलार हे देवदूतासारखेच धावून आले. त्यांनी धाडसाने दाखवलेल्या या कार्याचे त्या परिसरात मोठे कौतुक होत आहे.

Patan Taluka Landslide Police Patil Of Mirgaon Saved The Lives Of The Citizens bam92

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()