कऱ्हाड (सातारा) : माझं मुंडक तेवढंच बाहेर होतं, बाकी सगळं चिखलात रूतलं होतं. चोवीस तासानंतर चिखलाचा विळखा कमी झाला. त्यामुळे जीव वाचला. मी माझं मरण माझ्या डोळ्यानं बघितलंय, असं सांगून मिरगावच्या (Mirgaon Landslide) सत्तरीतील सरसाबाई देवजी बाकाडे (Sarasabai Devji Bakade) यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. मिरगावच्या (Heavy Rain in Patan) आजी सरसाबाई चोवीस तासापेक्षा जास्त काळ चिखलात रूतून बसल्या होत्या. गुरूवारी झालेल्या भूस्खलनात सरसाबाईंचे घर वाहून गेले आहे. (Patan Taluka Landslide Sarasabai Bakade Told A Thrilling Story About The landslide in Mirgaon)
मी माझं मरण माझ्या डोळ्यानं बघितलंय, असं सांगून मिरगावच्या सत्तरीतील सरसाबाई देवजी बाकाडे (Sarasabai Devji Bakade) यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
घरात सरसाबाई त्यांच्या सुनबाई श्रीमती सुमन, नातू व्यंकटेश, नात अनुष्का असे राहतात. त्यांचा मुलगा दोन वर्षापूर्वी वारला. घरी एवढीच लोक असतात. मुसळधार पावसाने गुरूवारी मिरगाववर आरिष्ट कोसळले. १९ जण ढिगाऱ्याखाली गेल्याची भीती होती. सायंकाळी डोंगरातून गावकऱ्यांच्या डोळ्यादेखत झालेले भूस्खलन अधिक धडकी भरवणारे ठरले. त्यातूनही अनेकजण वाचलेही. मात्र, देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण मिरगावच्या आजीच्या बाबतीत खरी ठरली. सरसाबाई यांचे घर दहा फूट चिखलात रूतले. काय करावे कळण्यापूर्वीच जो-तो जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत धावू लागला. सरसाबाईंची सुन, नातू-नातही धावली. मात्र, चिखलात आजी रूतून बसली. सुरक्षित स्थळी आलेल्या श्रीमती सुमन यांना आजी नसल्याचे समजताच त्यांच्या दुःखाला पारवार राहिला नव्हता. शोध सुरू झाला. त्यात पाऊस, चिखलाचा मोठा अडथळा येत होता. चोवीस तास ओलांडले अन् चिखल माखलेल्या आजी रांगत बाहेर येण्यासाठी धडपडत आहेत. असे बचाव कार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला दिसले. वेगाने त्यांनी आजीला सुरक्षित स्थळी नेले. आजी सरसाबाई चोवीस तास चिखलात अडकल्या होत्या. त्यांना पाहून नातेवाईकांच्याही अश्रूंचा बांध फुटला.
शुक्रवारी वाचलेल्या आजींना मानसिक धक्का मोठा बसला होता. त्या काहीच बोलत नव्हत्या. सर्वच बाधितांना कोयनेच्या मराठी शाळेत आणले आहे. तेथेही आजी काही बोलल्या नाहीत. मात्र, आज त्या पहिल्यांदाच बोलल्या अन् त्यांच्याही अश्रूंचा बांध मोकळा झाला. काय सांगू लेका त्या दिवशी माझं मरणच म्या पाहिलं, असं सांगून सरसाबाई यांनी बिथरत्या शब्दात निसर्गाचा पाहिलेला प्रलय सांगितला. त्या म्हणाल्या, काय सांगू म्या घरात बसले होते. संध्याकाळची वेळ होती. कडाकड असा मोठा आवाज झाला व सगळं डोंगरच गावावर येवून आदळला. माझ्या घरात मानेऐवढ पाणी व्हतं. माझ मुंडकचं तेवढ चिखलात नव्हतं. बाकी सार चिखलत रूतलं होतं. कोण मदतीला येईना. काय हालता, पण येईना चोवीस तास रात्रंदिन तशीच चिखलात रूतले होते. हळू-हळू हालचालीला वाव मिळाला. मग रांगत रांगत लहान बाळागत घराबाहेर आले. बाहेर सारा चिकलच होता. जीव वाचला होता. आता सुरक्षित जावं असं वाटून पावलं सपासप पडली अन् त्यावेळी वाचले.
Patan Taluka Landslide Sarasabai Bakade Told A Thrilling Story About The landslide in Mirgaon
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.