Shambhuraj Desai : विकासकामे न करणाऱ्यांकडूनच टीका : शंभूराज देसाई; सुपने येथे प्रचार सभा, टीका न करता कामे करत राहण्याचा निर्वाळा

Patan Vidhan Sabha 2024 : जे काम करत नाहीत, अशा मंडळींनी नुसतेच बोलत राहावे, टीका करत राहावी; पण आम्ही कोणावर टीका करणार नाही. आम्ही काम करत राहणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisakal
Updated on

तांबवे : ज्येष्ठ नेते (कै.) विलासकाका पाटील-उंडाळकर यांची या भागातील विकासकामांची परंपरा आम्ही कायम ठेवली असून, सुपने मंडलातील प्रत्येक गावात विकासकामे केली आहेत. ज्यांनी काहीच काम केलेले नाही, अशी मंडळी आमच्यावर बोलत आहेत.

खालच्या पातळीवर जाऊन नाहक टीका करत आहेत. जे काम करत नाहीत, अशी मंडळी नुसतेच बोलत असतात.

अशा मंडळींनी नुसतेच बोलत राहावे, टीका करत राहावी; पण आम्ही कोणावर टीका करणार नाही. आम्ही काम करत राहणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सुपने येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले गट), आरपीआय (कवाडे गट), रयत क्रांती संघटना व मित्र पक्ष महायुतीचे कार्यकर्ते-पदाधिकारी व मतदार बंधू-भगिनी उपस्थित होत्या. दीपक पाटील आणि कार्यकर्त्यांनी श्री. देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधीने पाच वर्षांत मतदारसंघात विकासकामे करायची आणि पाच वर्षांतून एकदा मत मागायला जनतेच्या दारापर्यंत जायचे असते. गेल्या पाच वर्षांत झालेली विकासकामे लोक स्वत:हून सांगू लागली आहेत. २०१९ च्या निवडणुकीला मते मागितली आणि जनतेच्या आशीर्वादाने आमदार आणि मंत्री झालो. दिलेली आश्वासने पूर्ण केली. आम्ही मतदारसंघात विकासकामे केली आहेत आणि यापुढेही करत राहणार आहोत.’’

सुपनेचा सिटी सर्व्हेचा प्रश्न मार्गी लावणार...

सुपने येथील पिण्याच्या पाण्याची योजना मार्गी लावली आहे. त्या गावच्या सिटी सर्व्हेचा विषय प्रलंबित आहे, तो विषय निवडणुकीनंतर मार्गी लावणार असल्याची ग्वाही मंत्री देसाई यांनी देऊन पाच वर्षांत मतदारसंघात ३२९ पिण्याच्या पाण्याच्या योजना, २५० पाणंद रस्ते मंजूर झाले. जिल्ह्यात सर्वाधिक योजना पाटण मतदारसंघात आणल्या असून, निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.