फलटणमधील 'या' रेल्‍वेमार्गांच्या कामास मार्चमध्‍ये प्रारंभ; PM मोदी, रेल्‍वेमंत्र्यांची राहणार उपस्‍थिती!

वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत फलटण- बारामती प्रस्तावित रेल्वेमार्गाची पाहणी केली.
MP Ranjitsinh Naik Nimbalkar
MP Ranjitsinh Naik Nimbalkaresakal
Updated on
Summary

फलटण- बारामती रेल्वेमार्गाचे भूसंपादन, तांत्रिक व अन्य मंजुरी प्राप्त झाल्या असून, सदर रेल्वे मार्गाचे टेंडर काढून ठेकेदार निश्चित झाला आहे.

फलटण शहर : फलटण-बारामती आणि फलटण-पंढरपूर या दोन्ही रेल्वेमार्गांच्या (Phaltan-Pandharpur Railway) प्रत्यक्ष कामाची सुरुवात मार्च महिन्‍याच्‍या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आणि रेल्‍वेमंत्री अश्‍विनी वैष्‍णव यांच्‍या उपस्‍थितीत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्याबाबत आगामी दोन, तीन दिवसांत निश्चित घोषणा अपेक्षित असल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

लोणंद- फलटण रेल्वेमार्ग (Lonand-Phaltan Railway) व फलटण रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर रेल्वे स्थानकावर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) बोलत होते. या वेळी मध्‍य रेल्वे सरव्‍यवस्‍थापक रामकरण यादव, बांधकाम विभाग प्रशासन अधिकारी अविनाशकुमार पांडे, पुणे विभागाच्‍या व्‍यवस्‍थापक श्रीमती इंदू आर. दुबे, गती शक्ती पुणे विभाग मुख्य प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक राजेश उपाध्याय यांच्‍यासह विविध अधिकारी व ठेकेदार, तसेच सदस्य संचालक, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
कोल्हापूर-सांगली महामार्गाचं चौपदरीकरण अद्याप लटकलेलंच; मंत्री नितीन गडकरींच्या घोषणेचं काय झालं?

खासदार रणजितसिंह म्हणाले, ‘‘लोणंद- फलटण- बारामती या ५६ किलोमीटर अंतरातील रेल्वे मार्गापैकी लोणंद- फलटण रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होऊन त्यावरून फलटण - पुणे मार्गावर प्रत्यक्ष वाहतूक सुरू झाली; पण फलटण- बारामती मार्गाचे काम गेल्या २०/२२ वर्षांपासून रखडले होते. ते आता सुरू होत आहे. आपण सतत पाठपुरावा केल्याने फलटण- बारामती मार्गाचे भूसंपादन पूर्ण होऊन आता या मार्गाचे आराखडे, अंदाजपत्रक तयार होऊन त्याला मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर प्रसिद्ध होऊन ठेकेदार निश्चित झाले आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे.

मुदतीत काम पूर्ण होऊन या मार्गावरूनही एप्रिल २०२६ अखेर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने थेट दिल्लीला जाण्याचे फलटणकर नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. दरम्यान, वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत फलटण- बारामती प्रस्तावित रेल्वेमार्गाची पाहणी केली. या मार्गावर नीरा नदीवर उभारण्यात येणाऱ्या रेल्वे पुलाच्या जागेची पाहणी संबंधित ठेकेदारांसमवेत करण्यात आली.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
Chandoli Tourism : चांदोली पर्यटन विकासाच्या पोकळ गप्पा; निधी आणण्यात अपयशी ठरले सगळेच मंत्री

खासदार रणजितसिंह म्‍हणाले

  • रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर फलटणहून थेट दिल्लीला जाणे शक्‍य

  • कऱ्हाड- कोल्हापूर आणि पुढे बेळगावपर्यंत, पुणे- मुंबईकडे जाता येणार

  • रेल्वेमार्गाचे स्वप्न माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिले होते

  • फलटण- पंढरपूर या ब्रिटिशकालीन प्रलंबित रेल्वेमार्गासाठी मान्यता

  • त्‍या पार्श्वभूमीवर सर्व त्‍या बाबींची पूर्तता

  • संबंधित अंदाजपत्रक सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्चाचे

  • निती आयोग आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आठवडाभरात घेणार

  • फलटण रेल्वे जंक्शन होऊन भारतभर रेल्वे प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्नशील

  • मुंबई- हैदराबाद सुरू होणारी बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून नेण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
Kalasa-Banduri Scheme : तब्बल 26.96 हेक्टर वनजमीन हस्तांतराचा प्रस्ताव फेटाळला; कर्नाटकाला मोठा दणका

फलटण- बारामती मार्गाचे काम दर्जेदार होणार

फलटण- बारामती रेल्वेमार्गाचे भूसंपादन, तांत्रिक व अन्य मंजुरी प्राप्त झाल्या असून, सदर रेल्वे मार्गाचे टेंडर काढून ठेकेदार निश्चित झाला आहे. चांगले ठेकेदार निश्चित झाल्याने या मार्गाचे काम दर्जेदार, वेळेत पूर्ण होईल, याची ग्वाही मध्‍य रेल्‍वेचे सरव्‍यवस्‍थापक राम करण यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली, तर फलटण- पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन रेखांकन करून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया रेल्वेने सुरू केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.