Phaltan : व्यक्तीने फडणवीसांवर आरोप करत ऑन कॅमेरा स्वत:चंच बोट कोयत्याने छाटलं; फलटणमधला थरकाप उडवणारा व्हिडिओ

Phaltan
Phaltan Sakal
Updated on

फलटण (सातारा) : फलटणमधील नंदकुमार ननावरे आणि त्याचा पत्नीचा आत्महत्या प्रकरणात पोलिस तपासाला वेग मिळत नसल्याने भावाने स्वतःच बोट छाटून ते गृहमंत्र्यांना पाठवणार असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांकडून योग्य ती उत्तर मिळत नसल्याने अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग भेट करणार असल्याचे सांगत डाव्या हाताचे एक बोट कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे उल्हासनगर मध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी केले आहे.

Phaltan
Anju in Pakistan : पाकिस्तानात अंजूला आली भारताची आठवण! 'ये मेरा इंडिया'वर केला डान्स; गालावरही बनवला तिरंगा

आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या बरमुड्याच्या खिश्यात एक चिट्ठीही मिळाली होती. या चिठ्ठीत कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची ही नावे आहेत. फिर्यादीत व्हिडिओ आणि चिठ्ठीच्या आधारे गुन्हा दाखल करीत असल्याचे म्हटले असतानाही रणजितसिंह निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख, कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची थेट आरोपी म्हणून नावे न टाकता त्यांना सरंक्षण दिले असल्याची खंत नंदकुमार ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी व्यक्त केली होती. सदरच्या गुन्ह्याचा तपास हा विठ्ठलवाडी पोलिसांकडून काढून घेत गुन्हे शाखेला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.