फलटणच्या तब्बल 12 पेट्रोलपंपांना मंजुरी; पुसेगाव, वाखरीसह 22 गावांना होणार लाभ

फलटणच्या तब्बल 12 पेट्रोलपंपांना मंजुरी; पुसेगाव, वाखरीसह 22 गावांना होणार लाभ
Updated on

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या "कृषिदेव पेट्रोलियम' या योजनेंतर्गत 12 पेट्रोलपंप सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून ढवळपाटी (वाखरी) येथील 
पेट्रोलपंपाचे उद्‌घाटन आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच झाले आहे. 

फलटण तालुक्‍यात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे सुरू आहेत. "कृषिदेव पेट्रोलियम' ही योजना ही रघुनाथराजे यांच्या कल्पकतेचा एक भाग आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. फलटण-कोरेगाव मार्गावर पुसेगाव फाटा ते ताथवडा घाट या परिसरापर्यंत पेट्रोलपंप नसल्यामुळे पुसेगाव फाटा ते ढवळपाटी, वाखरीसह परिसरातील 22 गावांना बाजार समितीच्या या "कृषिदेव' पेट्रोल पंपाचा फायदा होणार आहे, असे सभापती रघुनाथराजे यांनी सांगितले. 

सकाळ उद्योग समूहाच्या ऍग्रोवन मार्टच्या माध्यमातून मार्केट यार्ड, फलटण तसेच सबयार्ड वाखरी (ढवळपाटी) येथे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व गरजा खते, बियाणे, औषधे, पशुवैद्यकीय सल्ला तसेच इतर सर्व बाबी शेतकऱ्यांच्या थेट बांधापर्यंत पोचवण्यात येणार आहेत, असे सांगत याकामी बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व सर्व संचालकांनी केलेला पाठपुरावाही महत्त्वपूर्ण ठरला असल्याचे रघुनाथराजे यांनी नमूद केले. कार्यक्रमास नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, संचालक विनायक पाटील, प्रकाशराव भोंगळे, मोहनराव निंबाळकर, परशुराम फरांदे, बाळकृष्ण रणवरे, चांगदेव खरात, समर जाधव, शेतकरी रामदास कदम, पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, भैरवनाथ सोसायटीचे अध्यक्ष शिवाजीराव लंगुटे, साईकृपा वे-ब्रीजचे रामचंद्र नाईक-निंबाळकर, जिंतीचे शरद रणवरे आदींसह फलटण पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.