काल वाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामराजेंशी मुंबईत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुंबईतील आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे #ElectionWithSakal लक्ष लागले होते.
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दौऱ्यानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्याशी आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची काल चर्चा झाली नाही. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी रामराजेंशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावर पटेल यांनी रामराजेंच्या मनात कोणताही संभ्रम नाही. केवळ स्थानिक प्रश्नांबाबत त्यांच्या काही शंका असून, त्यावर आज (बुधवारी) आम्ही सर्वजण एकत्र बसून अजित पवारांशी बोलून निर्णय घेणार आहोत, असे सांगितले.
दरम्यान, आजच्या चर्चेनंतर रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेणार? याची उत्सुकता वाढली आहे. रामराजे नाईक- निंबाळकर हे हाती तुतारी घेणार असल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कार्यकर्त्यांनीही तसा आग्रही धरला आहे. काल शरद पवार यांनी इंदापुरात झालं ते आता १४ ला फलटणमध्ये, असे सूचक व्यक्त केल्याने रामराजे नाईक निंबाळकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाबाबतच्या चर्चेला अधिक उधाण आले आहे.
काल वाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामराजेंशी मुंबईत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुंबईतील आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे #ElectionWithSakal लक्ष लागले होते. अजित पवारांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर आज मुंबईत गेले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौऱ्यानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. प्रफुल्ल पटेल यांनी रामराजेंशी चर्चा करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांची नेमकी भूमिका जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘‘रामराजेंच्या मनात कोणताही संभ्रम नाही. केवळ स्थानिक प्रश्नांसंदर्भात त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत. याबाबत आम्ही आज (बुधवारी) अजित पवारांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.