सातारा : जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांनी शासनाच्या लसीकरण मोहिमेचा (Vaccination Campaign) वापर करून स्वत:चे राजकीय भवितव्य मजबुतीकरण करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील काही भागांत नेतेमंडळी आरोग्य यंत्रणेस वेठीस धरत अनधिकृतपणे लसीकरण शिबिरांचे (Vaccination Camp) आयोजन करत आहेत. ‘लस शासनाची आणि फोटोसेशन स्थानिक पुढाऱ्यांचे’ असे चित्र असल्याने या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. (Photo Session Of Political Leaders At The Government Corona Vaccine Center Satara Marathi News)
अनेक राजकीय नेतेमंडळी राजकीय वजन वाढविण्यासाठी, स्वप्रतिमा उजळविण्यासाठी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अनधिकृतपणे आरोग्य शिबिरे भरवित फलकबाजी करत आहेत.
जिल्ह्यात एक जानेवारीपासून लसीकरणास सुरवात झाली. सुरवातीला लशींचे डोस मोठ्या संख्येने जिल्ह्यात येत असल्याने सुमारे ३५ हजारांहून अधिक लसीकरण एकाच दिवसात केले जात होते. मात्र, त्यानंतर लशीचे डोस अल्प प्रमाणात उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहीम मंदावल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामीण रुग्णालये (Rural hospital), प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Center), उपकेंद्रे आदी ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी वाढू लागल्याचे दिसून आले. त्यामध्ये, अनेक आरोग्य केंद्रांवर लशीसाठी वशिला सुरू झाल्याचा प्रकार घडून येत होता. यामध्ये, सर्वसामान्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहिल्याचे दिसून आले.
दरम्यान, शासनाची लसीकरण मोहीम केवळ सरकारी आरोग्य केंद्रे (Government Health Centers) आणि परवानगी दिलेल्या खासगी रुग्णालयांत (Private Hospital) सुरू ठेवणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात पुढील वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेतेमंडळी राजकीय वजन वाढविण्यासाठी, स्वप्रतिमा उजळविण्यासाठी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अनधिकृतपणे आरोग्य शिबिरे भरवित फलकबाजी करत आहेत. त्यामुळे, पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीला आतापासून मतांचा गठ्ठा जमविण्यासाठी मतदारांसाठी झटत असल्याचा आव राजकीय मंडळी आणत आहेत. या प्रकारामुळे मागील काही दिवसांपासून राजकीय साठमारीत लशीचे डोस अडकल्याचे चित्र दिसून येत आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस
तीन दिवसांपूर्वी शहरालगत एका ठिकाणी राजकीय नेतेमंडळींनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून अनधिकृतपणे लसीकरण शिबिर आयोजित केले होते. मात्र, सरकारी आरोग्य केंद्र व परवानगी दिलेल्या खासगी रुग्णालयांव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी लसीकरण करण्यास परवानगी नाही. हा नियमबाह्य प्रकार लक्षात येताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्याला येत्या दोन दिवसांत लेखी खुलासा द्यावा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी अनधिकृतपणे लसीकरण झालेले आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडून आला आहे, त्याअंतर्गत आरोग्य केंद्रांतील अधिकाऱ्यांना लेखी खुलासा देण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांचा लेखी खुलासा आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
-डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
Photo Session Of Political Leaders At The Government Corona Vaccine Center Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.