रुग्णांच्या जिवाशी खेळ! दारूच्या नशेत डॉक्टरकडून उपचार, ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघड

डॉ. अरुण जाधव असे संबंधित डॉक्टरचे नाव आहे.
Pimpode Budruk Rural Hospital Doctor
Pimpode Budruk Rural Hospital Doctoresakal
Updated on
Summary

ग्रामीण रुग्णालयात मद्यप्राशन केलेला डॉक्टर (Doctor) नशेत रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपोडे बुद्रुक : येथील ग्रामीण रुग्णालयात मद्यप्राशन केलेला डॉक्टर (Doctor) नशेत रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जागृत नागरिकांनी या डॉक्टरला वैद्यकीय तपासणीसाठी वाठार पोलिसांच्या ताब्यात दिले असून, जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Pimpode Budruk Rural Hospital Doctor
धक्कादायक! डोक्याचे केस धरून फरफटत नेत दलित महिलेसह अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण; साताऱ्यातील घटनेने संताप

डॉ. अरुण जाधव असे संबंधित डॉक्टरचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की येथील ग्रामीण रुग्णालयात (गुरुवार) रात्री आठ वाजता राऊतवाडी व वाघोलीचे रुग्ण उपचारासाठी आले होते. ड्यूटीवर असणारे डॉ. अरुण जाधव यांनी मद्यप्राशन केल्याची शंका एका रुग्णाला आली.

त्यानंतर रुग्णाने उपचारास नकार देत ग्रामस्थांना हा विषय सांगितला. ही माहिती समजताच रुग्णालयात तरुण जमा झाले. यावेळी रुग्णालयात उभ्या असलेल्या डॉक्टरच्या मोटारीमध्ये ग्लास व दारूच्या (liquor) रिकाम्या बाटल्या सापडल्या. याबाबत वाठार पोलिसांना (Vathar Police) कळवण्यात आले.

Pimpode Budruk Rural Hospital Doctor
Jalna Maratha Andolan : 'मराठा समाजाला डिवचाल तर हिशेब चुकता करू'; पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे कोल्हापुरात पडसाद

पोलिसांनी मद्यपी डॉक्टरला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असता त्याने मद्यपान केल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मद्यप्राशन करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या डॉक्टरवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्वरित कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Pimpode Budruk Rural Hospital Doctor
Jalna Lathicharge : मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; फडणवीसांपासून मंत्री दानवेंपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

पिंपोडे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवालानंतर कारवाईबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.

-डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.