पीक कर्जाचे शंभर टक्के वाटप करा; खासदार पाटलांच्या प्रशासनाला सक्त सूचना

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News
Updated on

सातारा : सामाजिक जबाबदारी जोपासून बॅंकांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासासाठी कार्यरत राहावे, तसेच पीक कर्जाचे वाटप 100 टक्के करावे, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिल्या. 

जिल्हा सल्लागार समितीची बैठक नुकतीच नियोजन भवनात झाली. या वेळी खासदार पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, महाराष्ट्र बॅंकेचे उपअंचल प्रबंधक श्रीकृष्ण झेले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांच्यासह विविध बॅंकांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, "चालू वर्षासाठी 7 हजार 500 कोटींचा पतपुरवठा प्राथमिक क्षेत्रासाठी अग्रणी बॅंकेने तयार केला आहे. त्यापैकी राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बॅंकांद्वारे 5 हजार 571 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. सर्व बॅंकांनी आपले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे.'' खरीप हंगामासाठी 1 हजार 682 कोटी कर्ज वाटप केले असून, उद्दिष्टाच्या 105 टक्के काम बॅंकांनी साध्य केले आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या वेळी सांगितले. या वेळी श्री. गौडा यांनी राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती योजनेची माहिती देऊन सर्व बॅंकांनी योजनेंतर्गत यंदा बचत गटांना उद्दिष्टानुसार वित्त पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()