कऱ्हाड (जि. सातारा) : मास्क न वापरण्यासह सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी शहरात 300 जणांवर कारवाई करत प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे तब्बल एक लाख 45 हजारांच्या दंडाचीही वसुली केली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.
शहर पोलिसांनी कालपासून मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी 83 जणांवर कारवाई झाली. त्यात 41 हजार 500, तर काल (रविवारी) दिवसभरात 97 हजार 500 रुपये दंडाची आकारणी केली. शहरात वेगवेगळ्या पथकाद्वारे चार ते पाच ठिकाणांवर कारवाईसाठी पथक तैनात होते.
त्यात कोल्हापूर नाका, कृष्णा कॅनॉल चौक, कार्वे नाका, चावडी चौक, मुख्य बाजारपेठेत कारवाई झाली. 70 जणांवर मास्क न वापरल्याबद्दल, तर 13 जणांवर सामाजिक अंतर न पाळल्याबद्दल 41 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. कालही 195 जणांवर कारवाई झाली. त्यात 97 हजार 500 रुपयांच्या दंडाची आकारणीही केली आहे. शहर पोलिसांनी 110, तर वाहतूक पोलिसांनी 103 जणांवर कारवाई केली.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.