कऱ्हाड : गणेशोत्सवात मोठे ध्वनिक्षेपक व लेजर लाइटलाही बंदी कायम आहे. मात्र, कायद्याच्या चौकटीत व आवाजाच्या मर्यादा पाळून एक टॉप आणि एका बेसला परवानगी देण्यास काही हरकत नाही, असे पोलिसांनी जाहीर केले. गणेश मंडळे व पोलिसांमध्ये आज येथे समन्वयाची बैठक झाली. त्यात मंडळांनी ध्वनिक्षेपकाबद्दलच्या आक्रमक भूमिका मांडल्या.
शहरातील तब्बल ७० हून मंडळांतील कार्यकर्ते व पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. त्यात आझाद चौक, मंगळवार पेठ, पावसकर गल्ली, शुक्रवार, रविवार, बुधवारसह सोमवार पेठ, हद्दवाढ भागातील मंडळांचा प्रामुख्याने समावेश होता. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील व अन्य सर्व अधिकारी उपस्थित होते.