सातारा : कोरोना संसर्गामुळे रखडलेल्या पोलिसांच्या बदल्यांचे गॅझेट करण्यासाठी नियमानुसार यादी तयार करण्याची प्रक्रिया मुख्यालयात सुरू झाली आहे. या वर्षी केवळ प्रशासकीय बदल्याच होणार असल्याने विनंती बदलीसाठी इच्छुक असणाऱ्यांचा मात्र भ्रमनिरास होणार आहे. शासकीय नियमानुसार दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. सहा वर्षे एकाच ठिकाणी काम केलेल्या कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने यात बदली होते. त्याचबरोबर अडचणींमुळे बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जावरूनही बदल्या होतात. एका ठिकाणी बस्तान बसलेल्या कर्मचाऱ्यांना या गॅझेटची धास्ती नेहमीच ठरलेली असते. तर, दुसरीकडे जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असते. दरवर्षी आत्तापर्यंत बदल्यांचे गॅझेट पूर्ण होऊन कर्मचारी बदलीच्या ठिकाणी स्थिरावलेले असतात. यंदा मात्र, परिस्थिती वेगळी आहे.
महत्वाची बातमी : आरोग्यच्या पदव्युत्तर प्रवेशाच्या अर्जासाठी या तारखेपर्यंत मुदत
कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून देशभरामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्यातही लॉकडाउन झाले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इतर विभागांप्रमाणे पोलिस विभागही पूर्णपणे गुरफटलेला होता. अशा परिस्थितीत बदल्या करणे योग्य नसल्यामुळे राज्य शासनाने कोणत्याही प्रकारच्या बदल्या न करण्याबाबतचा अध्यादेश काढला होता. त्यामुळे पोलिसांचे वार्षिक गॅझेटही झालेले नाही. मात्र, शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार प्रशासकीय बदल्या करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे पोलिस दलातील गॅझेट होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. बदल्यांना परवानगी दिली असली तरी, शासनाने केवळ 15 टक्केच बदल्या करण्याची अटही ठेवली आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा कमी कर्मचाऱ्यांच्याच यावेळी बदल्या होणार आहेत.
Coronavirus : विश्वासार्हतेमुळे वृत्तपत्रांनाच वाचकांची पसंती
शासनाच्या आदेशानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुख्यालयात दिल्या आहेत. त्यानुसार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर 15 टक्के बंधनात किती जणांच्या व कोणाच्या बदल्या करायच्या, याचा निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी केवळ प्रशासकीय बदल्यांनाच परवानगी आहे. त्यामुळे विनंती बदल्या होणार नाहीत. परिणामी कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रियाही यंदा होणार नाही. परंतु, एकाच पोलिस ठाण्यात शासकीय नियमानुसार कार्यकाळ पूर्ण झालेल्यांना आता दुसरीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रातील काेणत्या जिल्ह्यात वाहनचालकांना तब्बल 50 लाखांचा दंड बसलाय....वाचा सविस्तर
त्यांच्या गाडीत काेयता, विळा, दांडकी हाेती....त्यांनी तयारी केली....अन् पुढे काय झाले वाचा सविस्तर
पूर्ण पारदर्शक बदल्या : तेजस्वी सातपुते
मागीलवेळी बदलीसाठी कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार बोलावले गेले होते. या कर्मचाऱ्याला रिक्त जागा दिसतील, अशी स्क्रिन उपलब्ध करू देण्यात आली होती. त्या जागांमधील त्यांच्या पसंतीची जागा निवडण्याची संधी त्यामुळे कर्मचाऱ्यांना राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध झाली होती. याद्यांची प्रक्रिया पार पाडल्यानंतर तशाच पद्धतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.
संपादन - सिद्धार्थ लाटकर
व्यापाऱ्यांनीच ठरवलं... आता पाच दिवस बंद पाळायचा; काेणत्या शहरात वाचा
BigBreaking : सातारा जिल्ह्यात 17 जूलैपासून कडकडीत लाॅकडाऊन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.