Satara News : आईचा सांभाळ न करणाऱ्या दोन फरारी मुलांसह दोन सुनांनाही पोलिसांनी केलं अटक; काय आहे प्रकरण?

पोलीस बंदोबस्तात मुंबई विक्रोळी मुंबई येथील न्यायालयात हजर ठेवुन प्रोक्लेमेशन वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे
Police arrested two fugitive children and two daughters-in-law who did not take care of their mother
Police arrested two fugitive children and two daughters-in-law who did not take care of their motherSakal
Updated on

Satara News : आईचा सांभाळ करत नसल्या प्रकरणी पिंपरे बुद्रूक ( ता. खंडाळा) येथील फरारी दोन मुलांसह त्यांच्या दोघांच्याही बायका आशा चार जणांना लोणंद पोलिसांनी न्यायालयाच्या अटक वॉरंट नुसार पिंपरे बुद्रूक ( ता. खंडाळा) येथे आज अटक केली.

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी,पिंपरे बुद्रूक (ता. खंडाळा) जि. सातारा येथील श्रीमती ताराबाई ज्ञानदेव शिंदे (वय ७५) या विधवा व जेष्ठ महीला असुन त्यांना त्यांची मुले प्रताप ज्ञानदेव शिंदे, विजय ज्ञानदेव शिंदे तसेच सुना सौ. निर्मला प्रताप शिंदे, सौ. सुषमा विजय शिंदे सर्व रा. पिंपरे बु. (ता. खंडाळा) जि. सातारा हे त्यांचा संभाळ करत नसल्याने त्या मुबईत त्यांच्या मुलीकडे आश्रयाला आहेत.

त्यांच्यावर मुलांनी तसेच सुनांनी कौटुंबीक हिंसाचार केलेमुळे त्यांनी कौटुंबीक हिंसाचार अंतर्गत विक्रोळी मुंबई येथील न्यायालयात २०१९ मध्ये याचौघां विरुद्ध पोटगीचा दावा दाखल केला आहे. दरम्यान हे चौघेही या दाव्या संदर्भात न्यायालयात हजार होत नसल्याने न्यायालयाने या चौघांविरुद्ध वॉरंट काढल्यावर हे सर्वजण फरार झाले होते. ते मिळुन येत नव्हते.त्यांना फरारी घोषित करून त्यांच्या विरुद्ध जप्ती वॉरंट, अटक वॉरंट, प्रोक्लेमेशन ऑर्डर काढले होते.

दरम्यान (ता. ८) यातील फरार आरोपी प्रताप ज्ञानदेव शिंदे, विजय ज्ञानदेव शिंदे हे त्यांचे राहते घरी पिंपरे बुद्रूक ( ता. खंडाळा) येथे आल्याची माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुशिल बी. भोसले यांना बातमी मिळाल्याने त्यांनी त्यांचे सहकारी पोलिस हावलदार धनाजी भिसे यांचेसह पोलीस कर्मचारी पाठवुन त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्या पत्नी सौ. निर्मला प्रताप शिंदे व सौ. सुषमा विजय शिंदे यांची माहीती काढुन महीला पोलीसां मार्फत त्यांनाही नमुद वॉरंटमध्ये अटक केले.

त्यानंतर त्यांना योग्य पोलीस बंदोबस्तात मुंबई विक्रोळी मुंबई येथील न्यायालयात हजर ठेवुन प्रोक्लेमेशन वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल भोसले, सहायक पोलिस फौजदार रमेश वळवी,हावलदार धनाजी भिसे, योगेश कुंभार, नितीन भोसले, विठठल काळे,अश्विनी माने,संजय चव्हाण आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.