यादव यांनी पोलिस दलात प्रामुख्यानं कोल्हापूर, पाचगणी, पुसेगाव, वाठार स्टेशन आदी पोलीस ठाण्यात सेवा बजावलीय.
कोरेगाव (सातारा) : चंचळी (ता. कोरेगाव) इथं काल रात्री ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या छबिण्यातील पालखीपुढं लेझीम खेळताना सेवानिवृत्त सहायक फौजदार चक्कर येऊन पडल्यानं त्यांना तातडीनं उपचारार्थ रुग्णालयामध्ये (Koregaon Hospital) नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
या बाबत प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी, चंचळीतील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेचा (Bhairavnath Yatra) काल रात्री छबिना होता. छबिण्यातील पालखी मिरवणूक उत्साहात निघाली होती. या मिरवणुकीतील पालखीपुढं गावातील हौशी ग्रामस्थ, चाकरमानी व युवक ढोल-लेझीम खेळत होते. ही मिरवणूक गावातील चौकामध्ये आल्यावर लेझीम खेळत असलेले ग्रामस्थ व सेवानिवृत्त सहायक फौजदार दशरथ मारुती कदम Dasharath Maruti Kadam (वय ७१) यांना खेळता-खेळता चक्कर आल्यानं ते खाली बसले. त्यानंतर त्यांना उलटी झाली.
दरम्यान, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून त्यांना त्वरित एका खासगी वाहनाद्वारे कोरेगावात उपचारार्थ नेले. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत यादव यांना हृदयविकाराचा धक्का बसला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. मृत यादव यांनी पोलिस दलात प्रामुख्यानं कोल्हापूर, पाचगणी, पुसेगाव, वाठार स्टेशन आदी पोलीस ठाण्यात (Police Station) यशस्वी सेवा बजावली. यादव यांच्यावर आज सकाळी चंचळीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांसह सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.