कऱ्हाडात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; 50 पेक्षा अधिक गायींची सुटका, साताऱ्याहून मागवली होती पोलिसांची कुमक

कऱ्हाड मंडईत चालविल्या जाणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून ५० पेक्षा जास्त गायींची सुटका केली.
Police raid illegal slaughterhouse in Karad
Police raid illegal slaughterhouse in Karadesakal
Updated on
Summary

कत्तलखान्यात गोवंशीय जनावरे आणली जाणार असल्याचे समजल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून पोलिसांनी त्याठिकाणी वॉच ठेवला होता. आज पहाटे पोलीस बंदोबस्तासह त्याठिकाणी छापा टाकण्यात आला.

कऱ्हाड : शहरातील मंडईत चालविल्या जाणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून ५० पेक्षा जास्त गायींची सुटका केली. यावेळी काहींची कत्तल करण्यात आल्याचेही समोर आले. पोलिसांनी तब्बल 500 किलोचे मांसही जप्त केले आहे. त्याचे नमुने तपासणीला पाठवले आहेत. या कारवाईसाठी साताऱ्यातून पोलीस (Satara Police) बंदोबस्त मागविण्यात आला होता.

साताऱ्यातील विशेष पथकासह, कऱ्हाड पोलीस (Karad Police) उपाधीक्षक कार्यालय, शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी पहाटे पाचपासून कारवाई केली. शहरातील भाजी मंडईत बेकायदेशीर कत्तलखाना चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाकडून गत काही दिवसांपासून खातरजमा केली जात होती.

Police raid illegal slaughterhouse in Karad
साताऱ्याचा उमेदवार आज ठरणार? शरद पवार साधणार 200 कार्यकर्त्यांशी संवाद, 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

कत्तलखान्यात गोवंशीय जनावरे आणली जाणार असल्याचे समजल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून पोलिसांनी त्याठिकाणी वॉच ठेवला होता. शुक्रवारी पहाटे पोलीस बंदोबस्तासह त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी ५० पेक्षा जास्त गायी त्याठिकाणी आढळून आल्या. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी काही जनावरांची कत्तल करण्यात आल्याचेही दिसून आले.

Police raid illegal slaughterhouse in Karad
Kolhapur : रोहित शर्मा आऊट होताच CSK च्या चाहत्यानं चिडवलं अन् मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी त्याचं डोकंच फोडलं

पोलिसांनी कत्तलखान्यातील गायी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईवेळी मंडई परिसरासह शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी साताऱ्याहून पोलीस कुमक मागविण्यात आली होती. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Police raid illegal slaughterhouse in Karad
Sangli Lok Sabha : काँग्रेसचा होतोय 'बाहुबली', 'कटप्पा'च्या भूमिकेत कोण? राजकीय वर्तुळात चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.