सातारा : 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केले. या संदर्भात साताऱ्यात काही युवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (Congress And NCP) कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केली होती. या युवकांची सातारा जिल्हा न्यायालयाने पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली आहे. (Police Release Six People From Satara On Maratha Reservation Issue Satara News)
निखिल विजय यादव, उदय राज रामचंद्र माने, शुभम शिवाजी मोहिते, यशराज प्रवीण शिंगटे, प्रसाद संजय भोसले, सूरज अशोक येवले यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 416, 420, 421 प्रमाणे सातारा शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांची पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.
या युवकांच्या वतीने अॅड. संग्राम मुंढेकर, अॅड. अमरसिंह काटकर, अॅड. प्रमोद शिंदे, अॅड. संजीव दुदुसकर, श्रीकांत पन्हाळे, शर्मिला शिंगटे, अॅड. अनुजा जमदाडे, अॅड. योगेश साळुंखे, अॅड. अभिजीत बाबर, अॅड. भक्ती जोशी, अॅड. युवराज देवडे, अॅड. संदेश कुंजीर, अॅड. मंजित माने, अॅड. मोनिका गायकवाड यांनी काम पाहिले. अॅड. शैलेश चव्हाण (उच्च न्यायालय) यांचे विशेष सहकार्य लाभले.
Police Release Six People From Satara On Maratha Reservation Issue Satara News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.