'सोशल मीडियामुळे बाललैंगिक अत्याचारांत वाढ; पालकांनी सतर्क रहावे'

Social Media
Social Mediaesakal
Updated on
Summary

अलीकडच्या काळात बाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले असून त्यामागचे मुख्य कारण सोशल मीडिया आहे.

सायगाव (सातारा) : अलीकडच्या काळात बाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले असून त्यामागचे मुख्य कारण सोशल मीडिया (Social Media) आहे. त्यामुळे पालकांनी सतर्क राहून कसलीही भीती न बाळगता येणारे संकट टाळावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी केले. सायगाव (ता. जावळी) येथील लोहिया विद्यालयात (Lohia Vidyalaya) पोलिस उपअधीक्षक कार्यालय व मेढा पोलिस ठाण्यांतर्गत (Medha Police Station) घेण्यात आलेल्या बालसंरक्षक जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी सुजाता देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा जयश्री माजगावकर, राजेश मापारी, खर्शी तर्फ कुडाळचे पोलिस पाटील सुहास भोसले, निर्भया पथकाचे अंमलदार यांच्यासह सायगाव विभागातील पालक उपस्थित होते. डॉ. जानवे-खराडे यांनी लैंगिक अत्याचारापासून कशा प्रकारे संरक्षण करता येईल, गुड टच, बॅड टच त्याबाबत व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन केले.

Social Media
शरद पवारांचं नाव घेऊन उभी हयात सत्तेचं केंद्रीकरण केलं
Medha Police Station
Medha Police Station

अमोल माने म्हणाले, ‘‘जावळी तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्यांचे संरक्षण करताना स्वतः लक्ष देऊन काळजी घ्यावी. कोणताही अनुचित प्रकार समजला तर त्याबाबतची माहिती तत्काळ मेढा पोलिसांना कळवावी.’’ यावेळी बालकांना जकातवाडीच्या महाविद्यालयातील पथनाट्याद्वारे बालसंरक्षण व लैंगिक अत्याचारापासून संरक्षण जनजागृती करण्यात आली. यावेळी शिरीष गोरे, शामल चव्हाण यांच्यासह निर्भया पथकातील प्रीतम पवार, सदाशिव कुंभार, अभिजित नवसरे उपस्थित होते. राजेश मापारी यांनी प्रास्ताविक केले.

Social Media
गोल रिंगणात मुलीला केस मोकळे सोडून बसवले अन् मांडीवर ठेवला 'कोंबडा'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()