Patan Politics : पालकमंत्री देसाईंच्या तालुक्यात तिसऱ्या शक्तीला बाळसे? आदित्य ठाकरेंच्या सभेने उद्धव ठाकरे गट चार्ज

पाटण तालुक्यात आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे.
Politics Patan Taluka
Politics Patan Talukaesakal
Updated on
Summary

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात झालेल्या सभेत आदित्य ठाकरे त्यांच्यावर भाषणात जोरदार हल्लाबोल करतील, असा अंदाज होता. मात्र, फारसे तसे झाले नाही.

ढेबेवाडी : विभागातील तळमावले (ता. पाटण) येथे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची झालेली सभा पाटण तालुक्यात आगामी काळात विशेषतः विधानसभेच्या निवडणुकांसाठी ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थकांची बॅटरी चार्ज करणारी ठरली. तालुक्याच्या एका टोकाला असलेल्या गावात झालेल्या या सभेतील उपस्थिती आणि उत्साह येथील परंपरागत गटाला आव्हान देणारी आणखी एक ताकद तालुक्यात वाढत चालल्याचे अधोरेखित करून गेली.

Politics Patan Taluka
शिंदे गटाकडं असणाऱ्या 'या' मतदारसंघावर भाजप करणार दावा; वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली, महिन्यात चित्र होणार स्पष्ट

अलीकडच्या काळात शिवसेनेतील (Shiv Sena) मोठ्या फुटीनंतर तालुक्यातील शिवसेना विद्यमान शिवसेना आमदारांच्या पाठीशी राहील, ठाकरे गटाला फरशी ताकद उरणार नाही, असे वाटत होते. मात्र, तसे झालेले नाही. उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक हर्षद कदम, सचिन आचरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आव्हानात्मक परिस्थितीतही किल्ला लढवत तालुक्यात निर्णायक स्थान तयार केल्याचे दिसून येत आहे.

काही महिन्यांपूर्वी मल्हारपेठ येथे आणि काल तळमावल्यात झालेली आदित्य ठाकरे यांची सभा, संजय राऊत यांची गुढे फाटा येथे झालेली सभा, त्यांनी भाषणातून उपस्थित केलेले मुद्दे, पालकमंत्र्यांवरील आरोप व टीका या साऱ्या बाबी पाहता येथील राजकारणातील युद्ध आता लपून छपून राहिलेले नाही, तर ते उघडपणे सुरू झाल्याचे दिसते आहे. पाटण तालुक्याच्या राजकारणात एक तिसरी शक्ती बाळसे धरायला लागल्याचेही त्यातून स्पष्ट होते आहे.

Politics Patan Taluka
महाराष्ट्राच्या महात्मा फुले योजनेवरही कानडी वक्रदृष्टी; दबावामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी 'इतक्या' केंद्रांना धाडली नोटीस

आगामी काळात पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. निवडणुकीत कोण कुणाला छुपी- उघड मदत करणार? हेही महत्त्वाचे ठरणार आहे. पोटापाण्यासाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या गावाकडच्या मुंबईकरांचा तालुक्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे, त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय शिजतंय? मुंबईत त्यांची कुणावर श्रद्धा आहे? (ठाकरे की शिंदे) यालाही महत्त्व आहे.

तूर्तास तरी पाटण तालुक्यात आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र असून, हर्षद कदम, सचिन आचरे व अन्य काही चेहरे पडद्यावर उघड दिसत असले तरी आतील बंकरमध्येही काही अदृश्य राजकीय शक्ती त्यांच्यासाठी बूस्टर डोस घेऊन बसल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Politics Patan Taluka
Female Boxers Kolhapur: कोऱ्या पेपरवर सह्या अन् प्रशिक्षकांची बदला घेण्याची धमकी; महिला बॉक्सरसोबत शिवाजी विद्यापीठात चाललंय काय?

राष्ट्रवादीला गुदगुल्या; पण...

काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात झालेल्या सभेत आदित्य ठाकरे त्यांच्यावर भाषणात जोरदार हल्लाबोल करतील, असा अंदाज होता. मात्र, फारसे तसे झाले नाही. हर्षद कदम यांनी मात्र प्रास्ताविकात पालकमंत्र्यांवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीला यातून काहीशा गुदगुल्या झाल्याचे बघायला मिळत असले तरी तत्कालीन राजकीय घडामोडीत तिसरी शक्ती त्यांच्यासाठीही आव्हानात्मकच ठरू शकते, हेही स्पष्टच आहे. निवडणुका तोंडावर असल्याने त्यांनीही सध्या सुरू असलेल्या झुंजीचा आनंद घेण्याऐवजी वाड्याबाहेर पडून अधिक सक्रिय व्हावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.