पवार साहेबांचं साताऱ्यावर विशेष प्रेम; पण परिस्थिती काय, तुम्ही करताय काय?; अजित पवारांनी फटकारलं

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाच्या (Yashwantrao Chavan Hall) ठिकाणी आगमन झाले. अनेकजण त्यांच्या स्वागताला पुढे आले. मात्र, 'चला लांब.. लांब..!,' असे सांगत त्यांनी स्वागतासाठी पुढे आलेल्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. तुम्हाला बोलले तर राग येतो, परिस्थिती काय आहे. कोरोनात नियम पाळत चला. हे बरोबर नाही, असेही त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन आलेल्यांना फटकारले. (Political News Deputy Chief Minister Ajit Pawar Avoided To Government Officers In Satara)

Summary

सातारा जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करतो. त्यामुळे आमचे साताराकडे विशेष लक्ष आहे. आता परिस्थिती काय आहे आणि तुम्ही नियम पाळत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना फटकारलं.

सातारा जिल्ह्यात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती बिकट आहे. त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी स्वतः साताऱ्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनेक पदाधिकारी, अधिकारी त्यांच्या स्वागताला पुढे आले. त्यांच्या हातात पुष्पगुच्छ होते. ते स्वागताला आलेले पाहून अजित पवार चांगलेच संतापले.

सातारा जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करतो. त्यामुळे आमचे साताराकडे विशेष लक्ष आहे. आता परिस्थिती काय आहे आणि तुम्ही नियम पाळत नाही. आम्ही तुम्हाला सारखे-सारखे नियम पाळायला सांगायचे का..?, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना फटकारण्यास सुरुवात केली. तुमचे सत्कार, पुष्पगुच्छ स्वीकारले नाही तर राग येतो. बोलले नाही तर राग येतो. परिस्थिती काय आहे, हे समजून घेत चला. कोरोनात कोणी ही नियम पाळत नाही. त्यामुळे नियम पाळत चला, असे ही त्यांनी बजावले.

Political News Deputy Chief Minister Ajit Pawar Avoided To Government Officers In Satara

Ajit Pawar
'टाळी एका हातांनी वाजत नाही, त्यासाठी दोन्ही हातांची गरज'; 'कृष्णा'त मनोमिलन शक्य?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()