काँग्रेसला 'अच्छे दिन'; आगामी निवडणुकीत स्‍वबळाचा नारा शक्य?

Congress
Congressesakal
Updated on

सातारा : सुवर्णकाळ अनुभवलेली सातारा शहर काँग्रेस (Congress) एकीत निर्माण झालेल्‍या बेकीमुळे काळवंडली आहे. आगामी निवडणुका (Election) स्‍वबळावर लढण्‍याचा नारा काँग्रेसचे राज्‍यस्‍तरीय नेते देत असले तरी त्‍यासाठीच्‍या घडामोडी दोन कार्यालयांतून समांतर चालणाऱ्या शहर काँग्रेसमध्‍ये होत नसल्‍याचे दिसून येत आहे. दोन समांतर कार्यालये आणि तेथील पदाधिकाऱ्यांची विभागणी साताऱ्यातील दोन्‍ही नेत्‍यांत झाल्‍याने ताकद असूनही शहर काँग्रेस नेतृत्‍वाअभावी क्षीण झाली आहे. हा क्षीण, मरगळ झटकत काम केल्‍यास येत्‍या निवडणुकीत शहर काँग्रेस आपल्‍या ताकदीच्‍या जोरावर निवडणुकीचे चित्र रंगवू शकते.

Summary

नोव्‍हेंबरअखेर मुदत संपणाऱ्या सर्वच पालिका, नगरपंचायतींच्‍या निवडणुकांसाठीची प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे.

नोव्‍हेंबरअखेर मुदत संपणाऱ्या सर्वच पालिका, नगरपंचायतींच्‍या निवडणुकांसाठीची प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे. निवडणुकांना काही महिने बाकी असले तरी त्‍या नजरेसमोर ठेवत सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे आणि गटबांधणीवर जोर देण्‍यास सुरुवात केलेली आहे. आगामी सर्वच निवडणुका स्‍बळावर लढण्‍याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी नुकतीच केली होती. या घोषणेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच सातारा शहर काँग्रेसमध्‍ये मात्र सन्नाटा असल्याचे दिसते आहे.

Congress
आमदार शिंदेंना रोखण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचा 'पत्ता ओपन'

मुळातच सातारा शहर काँग्रेस दोन गट आणि दोन कार्यालयांत सक्रिय आहे. पृथ्‍वीराज चव्‍हाण हे मुख्‍यमंत्री झाल्‍यानंतर काही प्रमाणात जिल्‍हा काँग्रेसला बाळसं आले होते. मात्र, ते बाळसे नंतर मित्रप्रेमामुळे झडले. जिल्‍हा, तालुका, शहरस्‍तरावर असणारी सध्‍याची काँग्रेस सर्वच पातळीवर पिछाडीवर असून, त्‍याला आपापसातील मतभेद कारणीभूत असल्‍याचे वारंवार दिसून आले आहे. सातारा शहरात काँग्रेसला वैभवशाली परंपरा आहे. काँग्रेसला मानणारा एक वर्ग देखील याठिकाणी असून, तो वर्ग निवडणुकीत पाच ते सहा हजारांच्‍या घरांत मतांत परावर्तित होत असतो. काहीही ठोस भूमिका, धोरणे राबवली जात नसतानाही निवडणुकीचे चित्र बदलू शकणाऱ्या शहर काँग्रेसला मात्र स्‍वत:चा आवाज, दबावगट निर्माण करता आलेला नाही.

Congress
मराठ्यांना 'ओबीसी'तूनच आरक्षण द्या, अन्यथा राज्यभर आंदोलनं

ताकद असूनही काँग्रेसची पिछेहाट

शहर काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची थेट विभागणी दोन्‍ही वाड्यांमध्‍ये झालेली आहे आणि परिस्‍थितीनुरूप नेहमी होत असते. सध्‍याच्‍या शहर काँग्रेसमध्‍ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारा मोठा गट आहे. या गटाची पालिका निवडणुकीच्‍या वेळची भूमिका नेहमी दोन्ही नेत्‍यांच्‍या बाजूनेच असते. यामुळे ताकद असूनही साताऱ्यात काँग्रेसची पिछेहाट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.