सनसनीखेज आरोप करण्यापलिकडं चित्रा वाघांना काही येतं?

काँग्रेस संपलेला नाही, नव्या कार्यकर्त्यांना ताकद देणार
Chitra Wagh-Satej Patil
Chitra Wagh-Satej Patil esakal
Updated on

सातारा : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) कोणत्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेल्या हे सर्वांना माहिती आहे. काही तरी सनसनाखेज आरोप करून चर्चेत राहणे यापलिकडे त्या काहीही काम करत नाहीत. आम्ही काय काम करतोय हे राज्यातील लोकांना माहिती आहे, त्यासाठी भाजपच्या नेत्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अशी सडेतोड टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Minister Satej Patil) यांनी साताऱ्यात केली. दरम्यान, काँग्रेस पक्ष संपलेला नाही, गावागावात आजही काँग्रेस पक्षाचा (Congress party) विचार आजही कायम आहे. आता नव्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना ताकद देण्याचे काम आम्ही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Summary

राज्याला दोन गृहराज्यमंत्री असूनही जनतेला माहितच नाहीत, अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध शासकिय विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष बॅकफुटला गेला असून त्याला ऊर्जितावस्था देणे गरजेचे आहे, याबाबत आपली भूमिका काय असणार आहे, या प्रश्नावर मंत्री पाटील म्हणाले, पक्ष संघटना वाढविणे ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण यादी घेऊन बसलो तर मागच्या पाच वर्षात आमच्यातील किती लोक दुसऱ्या पक्षात गेलेत, तीच काँग्रेसची ताकद होती. दुर्दैवाने आम्ही ज्यांना मोठे केले तेच आमच्यापासून लांब गेले. हे राजकारणात घडत असते. काँग्रेस पक्षाची विचारधारा ही गावागावात निश्चितपणे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष संपलेला नाही. आता नव्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे.

Chitra Wagh-Satej Patil
जबरा फॅन! देवेंद्र फडणवीसांचं नाव हृदयावरच गोंदवणार होतो; पण..

राज्याला दोन गृहराज्यमंत्री असूनही जनतेला माहितच नाहीत, अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. मुळा त्यांना बोलायचा अधिकार आहे का हा प्रश्न आहे. त्या कोणत्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेल्या हे सर्वांना माहिती आहे. काही तरी सनसनाखेज आरोप करून चर्चेत राहणे याच्या पलिकडे त्या काहीही काम करत नाहीत. आम्ही काय काम करतोय हे राज्यातील लोकांना माहिती आहे, त्यामुळे त्यासाठी भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणप्रश्नाबाबत ते म्हणाले, या प्रश्नाबाबत केंद्राकडून बोलण्यापेक्षा कृती झाली पाहिजे. ते काय कृती करणार याकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे दिल्लीत जाऊन सर्व खासदारांना भेटून पत्र देऊन आलेले आहेत. या अधिवेशनात निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाला यातून पळ काढता येणार नाही.

Chitra Wagh-Satej Patil
लाच प्रकरणी मंत्री तनपुरेंचा अ‍ॅक्शन मोड

शक्य असेल तेथे युती होणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर लढणे शक्य होणार आहे का, या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले, मुळात नाना पटोले यांच्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे. आम्ही अनेक ठिकाणी आघाडी करून निवडणुका लढलेल्या आहेत. तीन पक्ष एकत्रित लढल्याचे व जिंकल्याच विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्व महाराष्ट्राने बघितलेले आहे. शक्य असेल तेथे आघाडी होणार असून त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तीनही पक्षातील प्रमुख नेते मंडळी एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये कुठेही अडचण, मतभेद, गैरसमज समज नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chitra Wagh-Satej Patil
कऱ्हाड पालिकेत पुन्हा राजकारण पेटले; नगराध्यक्षा-सीओंत 'लेटरबॉम्ब'

पोलिसांच्या बदलीवरून जिल्ह्यात आत्महत्येचा प्रकार झालेला आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, मुळात दहा वर्षे ते सातारा शहरात कार्यरत होते. नियमाप्रमाणे त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांनी अशा पध्दतीने पाऊल उचलायला नको होते. त्यांचा मेडिकल रिपोर्ट येईल यामध्ये सर्व सत्य बाहेर येईल. जिल्ह्यातील अनेक पोलिस दहा दहा वर्षे एकाच ठिकाणी एकाच विभागात कार्यरत आहेत, याकडे लक्ष वेधले असता सतेज पाटील म्हणाले, याविषयी मी पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे. एकला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असे होता कामा नये. नियम सर्वांला सारखा लावला पहिजे, अशी सूचना मी त्यांना केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.