शरद पवारांचं नाव घेऊन उभी हयात सत्तेचं केंद्रीकरण केलं

Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Updated on
Summary

खत्री यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर बोलण्यापूर्वी विचार करावा.

कोरेगाव (सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) अनेक पदे भूषवूनही सुनील खत्री (Sunil Khatri) यांनी विकासावर बोलावे, हा तर कोरेगावच्या राजकारणातील एक मोठा विनोद आहे. आता श्री. खत्री यांनी आपला पक्ष कोणता, हेही जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रतिभा बर्गे (Pratibha Barge) यांनी दिले आहे.

यासंदर्भातील पत्रकात प्रतिभा बर्गे यांनी म्हटले आहे, की कोरेगाव शहरातील आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केलेल्या कामांची यादी छापायला वृत्तपत्राचा एक अंक पुरणार नाही. कोरेगाव शहरातील १८ कोटींची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सात कोटींची उपजिल्हा रुग्णालयाची इमारत, पाच कोटींचा पशुवैद्यकीय दवाखाना, न्यायालयाच्या आवारातील नवीन सुसज्ज इमारत, केदारेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा तसेच मंदिराजवळील फ्रेंच स्थापथ्य शास्त्रानुसार बांधलेला आर्च पूल, नाना-नानी पार्क त्याचबरोबर आयटीआयसारख्या शैक्षणिक दर्जा असणाऱ्या इमारती, पालकमंत्री असताना मध्यवर्ती रस्त्यांचे रुंदीकरण, वीज वितरण कंपनीच्या पोलचे शिफ्टिंग, कोरेगाव शहराला सातारा फिडरशी जोडणे आणि कोरेगावच्या गल्लीबोळात केलेली विकासकामे झापड ओढलेल्या श्री. खत्री यांना दिसणार नाहीत. पत्रकार परिषदेच्या वेळी आजूबाजूला बसलेल्यांना विचारले असते, तरी समजले असते. राष्ट्रवादी पक्षाने ज्यांना भरभरून दिले, जिल्हा नियोजनला संधी दिली, त्यातून आपण कोरेगावचा काय विकास केला? तुमच्याच भाषेतील अपयश असेल, तर ते तुमचे आणि आजूबाजूला बसलेल्या मंडळींचे अपयश नाही का?

Sharad Pawar
जरंडेश्वर कारखाना घोटाळ्यात अजित पवारांचा हात

खत्री यांनी शरद पवार साहेबांचे नाव घेऊन उभी हयात सत्तेचे केंद्रीकरण केले. स्वाभिमानाची आवई दिली, ती आता हवेतच विरली व स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची केलेली दिशाभूल लक्षात आल्याने कार्यकर्ते पुन्हा माघारी परतू लागले आहेत. त्यामुळे श्री. खत्री यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर बोलण्यापूर्वी विचार करावा. येणाऱ्या काळातही शशिकांत शिंदे कोरेगावच्या विकासासाठी कटिबद्ध असून, यातील बरीचशी कामे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केली आहेत. पराभव स्वीकारून ते पुन्हा कामाला लागले आहेत. कोरेगावसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच कोटींची विकासकामे मंजूर केली असून, लवकरच या कामांना सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. कोरेगाव शहराचा विकास महाविकास आघाडीच्या माध्यमातून होताना कोरेगावात विकासकामांची बॅनरबाजी सुरू आहे. मात्र, या बॅनरवरून महाविकास आघाडीतील नेत्यांचे सोडाच खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही फोटो गायब आहेत. यावरून सर्व काही लक्षात येत असल्याचा टोला प्रतिभा बर्गे यांनी लगावला आहे.

Sharad Pawar
ग्रामविकास मंत्रालयाचे 1,500 कोटींचे टेंडर मुश्रीफांच्या घरातच : सोमय्यांचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()