सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (District Co-operative Bank Election) सर्वसमावेशक आघाडीच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीचे (NCP) नेते आहेत. पण, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून शिवसेनेतून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai), आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) व युवा नेते शेखर गोरे (Shekhar Gore) यांनीही संचालक होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) तिघा इच्छुकांपैकी कोणाला सामावून घेतले जाणार, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत.
जिल्हा बॅंकेवर आजपर्यंत शिवसेनेचा कोणीही नेता संचालक राहिलेला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचेच कायम वर्चस्व राहिले आहे.
जिल्हा बॅंकेवर आजपर्यंत शिवसेनेचा कोणीही नेता संचालक राहिलेला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचेच कायम वर्चस्व राहिले आहे. मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी व काँग्रेसमधून काही नेतेमंडळी भाजपमध्ये गेली. त्यातील काही जण सध्या जिल्हा बॅंकेवर संचालक आहेत. विशेष म्हणून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. त्यांच्याभोवती जिल्हा बॅंकेचे राजकारण फिरत आहे. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्यातही विविध निवडणुकीत हे तीनही पक्ष एकत्र राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण, जिल्ह्यावर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांना सामावून घेण्याची भूमिका राष्ट्रवादीचे नेते करणार का, हे महत्त्वाचे आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आतापर्यंत ठरावांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रमही जाहीर झालेला आहे.
यावेळेस जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील नेतेही आग्रही आहेत. त्यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, युवा नेते शेखर गोरे यांचा समावेश आहे. त्यापैकी शंभूराज देसाई यांना मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून बॅंकेवर संचालक म्हणून घेण्याबाबत शब्द देण्यात आलेला आहे. त्यानुसार त्यांनी यावेळेस पाटण सोसायटी मतदारसंघातून ठरावही केले आहेत. ते स्वत: किंवा पत्नीला जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनीही तयारी केली आहे. त्यासोबतच माणचे नेते शेखर गोरे यांचीही तयारी आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक होणार आहे.
लवकरच जिल्ह्याचे संपर्कमंत्री उदय सामंत, माजी मंत्री दिवाकर रावते हे दौरा करणार असून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन कोणाला जिल्हा बॅंकेवर पाठवायचे, याबाबतचा निर्णय होणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेवर यावेळेस शिवसेनेचा एक तरी संचालक होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीचे नेते महाविकास आघाडीचा पॅटर्न जिल्हा बॅंकेत राबविताना शिवसेनेला सामावून घेणार का, हा कळीचा मुद्दा आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनाही आग्रही आहे. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेलाही जिल्हा बॅंकेत स्थान मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, शेखर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन कोणाला जिल्हा बॅंकेवर पाठवायचे, याबाबत निर्णय घेणार आहोत.
-प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.