कऱ्हाडला सव्वाशेरांच्या तलवारी म्यान

Karad municipal
Karad municipalesakal
Updated on
Summary

एकला चलोरे, हम अभी कम नाही, अशा गर्जना करून सिंगल वॉर्डात शेरास सव्वाशेर तयार झाले होते.

कऱ्हाड (सातारा) : एकला चलोरे, हम अभी कम नाही, अशा गर्जना करून सिंगल वॉर्डात शेरास सव्वाशेर तयार झाले होते. अनेक इच्छुकांनी त्यांच्या तलवारी तळपत्या ठेवल्या होत्या. मात्र, काल मंत्रिमंडळाने द्विसदस्यीय पद्धतीने पालिकांच्या निवडणुका (Karad Municipal Election) घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या सगळ्या स्वयंघोषितांच्या तलवारी आता म्यान झाल्या आहेत. शेरास सव्वाशेरसहीत अनेकांचा अंदाज चुकविण्याचा विडा उचलणाऱ्या स्वयंघोषितांचा फोकस आघाड्या कशा होणार, यावर केंद्रित झाला आहे. द्विसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या वॉर्डरचनेमुळे स्थानिक आघाड्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

मागील काही निवडणुकांचा अनुभव पाहता एकमेकांची जिरवण्यासाठी होणाऱ्या आघाड्यांच्या तडजोडींचे राजकारण यंदाही शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जोरात चालणार आहे. २०११ पासून विशिष्ट गटाला उचलून धरण्यासाठी आघाड्यांभोवती फिरणार वारे यंदाही स्थानिक नेत्यांचे महत्त्व वाढविणारेच ठरणार आहे. निवडणूक आली, की आघाडीच्या तडजोडींच्या चर्चा वाढतात. बैठकाही सुरू होतात. आघाड्यांच्या पातळीवर होणाऱ्या तडजोडीवर कऱ्हाडचे स्थानिक राजकारण भलतेच गाजते. सुरुवातील सिंगल वॉर्डरचना करण्याचे जाहीर करून शासनाने अनेकांच्या आशा उंचावल्या. अनेकांच्या पालिकेत फेऱ्याही वाढल्या होत्या. सिंगल वॉर्डात अनेक शेरास सव्वाशेर तयार होऊन त्यांच्या डरकाळ्या फोडल्या जात होत्या. मात्र, काल मंत्रिमंडळाने घेतलेल्या द्विसदस्यीय वॉर्डरचनेमुळे अनेकांच्या तलवारी म्यान झाल्या आहेत. अनेक इच्छुक आघाडी कशी होणार याच चर्चेत रममाण आहेत.

Karad municipal
पत्‍नीच्या पराभवाचा शिवेंद्रसिंहराजे उदयनराजेंचा बदला घेणार?

अपक्ष, एकाला चोलोरे अशा गर्जना करून काहींनी अक्षरशः वॉर्डनिहाय काम सुरू केले होते. मात्र, त्यांच्याच स्वप्नाला सुरुंग लावण्याचे काम काल राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या द्विसदस्यीय वॉर्डरचनेने केले आहे. बदललेल्या वॉर्डरचनेमुळे पालिकेतील वातावरणही आता त्याच दृष्टीने फिरू लागले आहे. सिंगल वॉर्डरचनेचे काम अद्यापही सुरू नव्हतेच. तोपर्यंत द्विसदस्यीय पद्धतीचा घोषणा झाल्याने शहरातील आघाड्यांसह पक्षीय पातळीवरील वातावरण काल सायंकाळपासूनच बदलले. काल रात्रीपासून आघाड्यांची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक आघाड्यांसह पक्षीय पातळीवरील निर्णयाला पोषक ठरणारा निर्णय राज्य शासनाने पालिकांच्या वॉर्डरचनेबाबत घेतल्याने त्या आघाड्यांची चर्चा आता जोरात रंगते आहे. कोण कोणाबरोबर जाणारा याचा अंदाज बांधला जातो आहे, प्रत्यक्षात पालिकांच्या आघाड्यांत अद्याप त्याची चर्चा सुरू आहे. हळूहळू त्यांच्याही हालचाली गतिमान होतील, अशीच अपेक्षा आहे.

Karad municipal
'संसार उद्ध्वस्त करणाऱ्या सोमय्यांवर कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करू'

पायघड्यांनाही मर्यादा

सिंगल वॉर्डसाठी होणाऱ्या तडजोडींसाठी अनेकांसमोर पायघड्या घालाव्या लागत होत्या. मात्र, आता द्विसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांमुळे पक्ष, आघाड्याचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे मनधरणी करण्यावर मर्यादा येणार आहेत. आता कोणाची कशी आघाडी होणार याची शहरात चर्चा चांगलीच गाजते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()