'कृष्णा'त 32 वर्षांपासून सत्ता संघर्ष; मोहिते-भोसले मनोमिलनाचा 2010 मध्ये पराभव

Krishna Sugar Factory
Krishna Sugar Factoryesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : सातारा, सांगली जिल्ह्यांतील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात (Krishna Sugar Factory Election) ३२ वर्षांपासून सत्ता संघर्ष कायम आहे. कारखान्यात १९८९ मध्ये पहिली ठिणगी पडली. त्यावेळी ‘कृष्णा’च्या कार्यक्षेत्रातील सर्वच तालुक्यांतील वातावरण ढवळले होते. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते (Yashwantrao Mohite) व कृष्णा उद्योग समूहाचे (Krishna Industries Group) प्रमुख जयवंतराव भोसले (Jayawantrao Bhosale) यांच्यातील टोकाच्या अन्‌ तीव्र संघर्षात पहिले ऐतिहासिक सत्तांतर ‘कृष्णा’ने अऩुभवले. त्यानंतर सत्तेसाठीचा संघर्ष आजअखेर कायम आहे. (Political Struggle For 32 Years In Krishna Co-operative Sugar Factory Satara Political News)

Summary

कारखान्यात कृष्णा काठावरील पारंपरिक विरोधक मोहिते-भोसले यांच्या मनोमिलनालाही पराभवाशी सामना करावा लागला आहे.

कारखान्यात कृष्णा काठावरील पारंपरिक विरोधक मोहिते-भोसले यांच्या मनोमिलनालाही पराभवाशी सामना करावा लागला आहे. २०१० मध्ये पारंपरिक मोहिते-भोसले गट एकत्रित असताना संघर्षाला पूर्णविराम मिळेल, असे वाटत असतानाच संस्थापक पॅनेलच्या अविनाश मोहिते (Founding panel Avinash Mohite) यांच्या रूपाने तिसऱ्या पर्यायी नेतृत्वाचा उदय झाला अन्‌ ‘कृष्णा’ने पुन्हा ऐतिहासिक सत्तांतर अऩुभवले. त्यानंतर आजअखेर सत्ता संघर्ष कायम आहे. ‘कृष्णा’च्या अध्यक्षपदाची धुरा (कै.) जयवंतराव भोसले, मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते यांनी सांभाळली. अध्यक्षपदाची सर्वाधिक मोठी म्हणजे काराखाना स्थापनेपासून १९८९ पर्यंत म्हणजे जवळपास ३० वर्षांची कारकिर्द (कै.) जयवंतराव भोसले यांच्या नावावर आहे. १९८९ मध्ये ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव मोहिते यांनी त्यांचे बंधू (कै.) जयंवतराव भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला. त्यांनी रयत संघर्ष मंचची स्थापना करत सत्ताधारी भोसले गटाविरोधात रान पेटवले. त्यात पहिले ऐतिहासिक सत्तांतर झाले. त्यावेळी मदनराव मोहिते यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्या कालवधीत श्री. मोहिते सलग दहा वर्षे म्हणजे १९९९ पर्यंत अध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा भोसले गटाने (Bhosale Group) कंबर कसली. ‘कृष्णा’त पुन्हा संघर्ष पेटला. पुन्हा सत्तांतर झाले. यावेळी डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष झाले. पाच वर्षाने पुन्हा मोहिते गट सक्रिय झाला अन्‌ भोसले गटाला आव्हान दिले. त्यात पुन्हा सत्तांतर झाले. यावेळी मोहिते गटाच्या डॉ. इंद्रजित मोहिते यांना संधी मिळाली.

Krishna Sugar Factory
अतिवृष्टीचे पंचनामे तीन दिवसांत करा; गृहराज्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

डॉ. मोहिते यांनी २००७-२००८ मध्ये मोहिते-भोसले गटातील संघर्षाला पूर्णविराम मिळावा, यासाठी दोन्ही गटांत ऐतिहासिक मनोमिलन केले. मोठ्या दिमाखदार कार्यक्रमात त्यांची नांदी झाली. मदनराव मोहितेही काही कालावधीनंतर त्यात सामील झाले. मनोमिलन होत असतानाच कृष्णाकाठावर तिसरा पर्याय उदयास येत होता. अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत मोहिते-भोसले यांच्या मनोमिलनाला आव्हान दिले. त्याला सभासदांची साथ मिळाल्याने १९८९ नंतर तब्बल २१ वर्षांनी २०१० मध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाले. श्री. मोहिते हे कारखान्याचे अध्यक्ष झाले. पहिल्यांदाच मोहिते किंवा भोसले यांच्यापेक्षाही वेगळा अध्यक्ष झाला. त्यानंतरच्या कालावधीत पुन्हा मोहिते-भोसले गट दुरावले. त्यामुळे २०१५ मध्ये कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. सत्ताधारी अविनाश मोहिते यांना आव्हान देण्यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते व डॉ. सुरेश भोसले (Dr. Indrajit Mohite and Dr. Suresh Bhosale) अशी तीन पॅनेल समोरासमोर ठाकली. त्यात भोसले गटाने बाजी मारत १५ जागांवर विजय झाला. संस्थापक पॅनेल सहा जागांवर मर्यादित राहिले. बहुमतामुळे डॉ. भोसले यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर आत्ता पुन्हा २०२१ मध्ये ‘कृष्णा’त सत्तेचा संघर्ष सुरू आहे. त्यात बाजी कोण मारणार, हा भाग अलहिदा. मात्र, सत्तेच्या संघर्षाची ३२ वर्षांचा इतिहासही बरेच काही सांगून जातो.

Krishna Sugar Factory
..तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवायच्या कशा?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल

दोन वेळा मिळाली मुदतवाढ

कृष्णा कारखान्याच्या कालावधीत दोन वेळा संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. दोन्ही वेळी मिळालेल्या मुदतवाढीच्या कार्यकाळात कारखान्याचे अध्यक्षपदाची धुरा डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे होती. लोकरी मावा व दुष्काळामुळे २००४ मध्ये निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्यावेळी अध्यक्षपदी डॉ. भोसले होते. त्यानंतर कोरोनामुळे यंदाही मुदतवाढ मिळाली. आत्ताही डॉ. भोसले अध्यक्ष आहेत.

Political Struggle For 32 Years In Krishna Co-operative Sugar Factory Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.