कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड पालिकेचे (Karad Municipality) राजकारण सिंगल वॉर्डमुळे गतीत आहे. त्यामुळे पालिकेच्या स्थानिक आघाड्यांच्या नेत्यांची छोट्या कार्यक्रमांसह वॉर्डातील वाढदिवसासही हजेरी दिसू लागलीय. स्थानिक आघाड्यांभोवती फिरणाऱ्या राजकारणाला गती देण्यासाठी राजकीय तडजोडीही निश्चितच आहेत. कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादीसह (NCP) भाजपच्याही (BJP) पदाधिकाऱ्यांची भेळमिसळ पालिकेत दिसते. त्याला गावाचा विकास असे गोंडस नाव देवून राजकीय तडजोडीच्या स्थानिक आघाड्यांना जन्माला घातले जाते. त्यासाठीच्या हालचाली याही वेळी गतीमान आहेत. पालिकेच्या राजाकराणात राजकीय पक्षांची एन्ट्री यंदा जवळपास असली तरी स्थानिक आघाड्यांकडून ती एन्ट्री रोखण्यासाठी तडजोडींची फिल्डींगही निश्चित लागलीय.
कऱ्हाडला पाच वर्षात स्थानिक आघाड्यांचाच वरचष्मा आहे. राजकीय पक्षांची भेळमिसळ आहे.
कऱ्हाडला पाच वर्षात स्थानिक आघाड्यांचाच वरचष्मा आहे. राजकीय पक्षांची भेळमिसळ आहे. स्थानिक आघाडी, गावाचा विकास अशा गोंडस नावाखाली होणारे एकत्रीकरण पालिकेतील सत्ताकारणही ठरते आहे. त्यामुळे स्थानिक कंगोऱ्यांच्या राजकरणातून आघाड्या जन्माला येतात. स्वतः निवडून येण्यासाठी काही नेते खतपाणीही घालतात. ही राजकारणाची मोडस पालिकेच्या वर्तुळात आहे. त्याला याही वेळी गती आलीय. भाजपच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे व सध्याही पालिकेतील भाजपच्या गटाचे सल्लागर म्हणून राजकीय गोटात चर्चेत असलेले उपाध्यक्ष जयवंत पाटील जनशक्ती आघाडीचे घटक आहेत. त्यांना मिळालेले पाच वर्षांचे उपाध्यक्षपद जनशक्ती आघाडीनेच दिले आहे. भाजपच्या सत्तेला पत्र देवून पाठिंबा देणारे नगरसवेक इंद्रजीत गुजर सध्या पृथ्वीराज चव्हाण गटासोबत आहेत. भाजपच्याच पाठिंब्यावर स्वीकृत नगरसवेकपदावर विराजमान झालेले फारूक पटवेकरही सध्या चव्हाण यांच्या सोबत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नगरसवेक गुजर यांनी भाजपच्या पाठिंब्याचे पत्र मागे घेतलेले नाही, तर भाजपनेही पटवेकर यांचा अद्याप राजीनामा घेतला नाही. त्यामुळे ती अघोषित आघाडी स्थानिक कंगोऱ्यावर आहे, हेच स्पष्ट करते. सत्ताधारी जनशक्तीतील राजेंद्र उर्फ आप्पा माने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. पालिकेसाठी कॉंग्रेस वेगळा विचार करत आहे. त्यातही ते सक्रीय असतीलही तरीही पालिकेत त्यांनी जनशक्तीशी सवतासुभा घेतलेला नाही. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव खासदार उदयनराजे यांचे समर्थक आहेत, मात्र ते भाजपमध्ये नाहीत. त्यांची स्वतःची यशवंत विकास आघाडीही आहे. तरीही ते जनशक्तीचे गटनेते आहेत. त्यामुळे कऱ्हाड पालिकेत राजकीय पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांना जास्त महत्व असल्याने स्थानिक आघाड्या राजकीय पक्षांची एन्ट्री रोखण्यासाठीही कार्यरत होतील, अशी अपेक्षा आहे.
लोकशाही, जनशक्ती चाचपणीत तर अन्य पडद्यामागेच!
लोकाशाही, जनशक्ती आघाडीकडून त्याची चाचपणी सुरू आहे. यशवंत विकास आघाडीसह कृष्णा विकास आघाडी, लोकसेवला आघाडी अद्यापही पडद्यामागे आहे. शहर विकास आघाडीही कार्यरत होण्याच्या मार्गावर आहे. युवकांनी मध्यंतरी स्थापन केलेली आघाडीही आता खुलू लागलीय. त्यामुळे स्थानिक आघाड्या व त्या मागून हालणाऱ्या राजकीय हालचालींना पक्षीय पातळीवर रोखण्यात अद्यापही पालिकेच्या वर्तुळात कोणत्याच नेत्याला किंवा राजकीय पक्षाला अद्यापही यश आलेले नाही. मागील निवडणुकीत भाजपने आखलेलेल काही राजकीय आडाखे यशस्वी झाल्याने नगराध्यक्षपदासह चार नगरसवेक त्यांचे आले मात्र उर्वरीत सत्ता विरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांच्याच हातात राहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.