काळ्या यादीची भीती दाखवून ठेकेदारांशी 'सेटलमेंट'

दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारांवरील कारवाईतही राजकारण
Karad Road
Karad Roadesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : चारच महिन्यापू्र्वी शहरातील चकाचक झालेल्या रस्त्यांची मुसळधार पावसात (Heavy Rain) धुळधाण उडाली. त्यांचा दर्जा अत्यंत खराब होता, त्यावरून सामान्य नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. रस्त्यांचे खराब काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा पालिकेने (Karad Municipality) केली होती, त्याला दिड वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही ती काळी यादी प्रसिद्धच झालेली नाही. वारंवार सुमार दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना (Contractor) काळ्या यादीच (Blacklist) भीती दाखवून पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी करत असलेल्या सेटलमेंटचीच चर्चा आता शहरभर गाजते आहे.

Summary

चारच महिन्यापू्र्वी शहरातील चकाचक झालेल्या रस्त्यांची मुसळधार पावसात (Heavy Rain) धुळधाण उडालीय.

शहरातील रस्त्यांची कामे, त्याचा दर्जा व दुरूस्तीवरून नगरपालिका कधी आक्रमक होताना दिसली नाही. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची भीमगर्जना झाली खरी, मात्र पुढे काहीच झाले नाही. त्यासाठी पालिकेत पुढाकार घेणारेही मुग गिळून गप आहेत. त्यात होणारे राजकारण रस्त्यांचे खराब काम करणाऱ्या व देखभाल दुरूस्तीकडेही दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांना क्लीन चीट देत आहेत. ठेकेदारही पालिकेतील अस्थिर राजकीय चिखलफेकीचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे पालिकेत ठेकेदारही गब्बर होत आहेत. रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची अनामत रक्कम जप्तीचा निर्णयही अधुराच आहे. प्रमुख मार्गासहीत महत्वाचे खराब रस्ते चार महिन्यापूर्वीच चकाचक केले होते. त्यासाठी मोठा निधी खर्च केला होता. मात्र, तो पाण्यात गेला.

Karad Road
"आगामी निवडणुका पूर्ण क्षमतेने लढा"

तीन दिवसांच्या मुसळधार पावसात रस्त्याची धुळधाण झाली. त्यामुळे त्याच्या दर्जाची चर्चा रंगली. रस्ते, त्यावरील खड्डे व त्यांचा दर्जावरून आता पालिका टार्गेट होते आहे. पालिकेच्या बैठकीत रस्त्यांच्या दर्जावरून कारवाईच्या घोषणाही झाल्या खऱ्या, मात्र प्रत्यक्षात काही झालेच नाही. त्यामुळे सेटलमेटच्या संशयाला वाव आहे. रस्त्यांच्या कामांचे सोशल ऑडिटची गरज आहे. मात्र, ते न करता पालिका ठेकेदाराशी सेटलमेंट करते आहे. वास्तविक रस्त्यांचे स्वतंत्र ऑडिट करून ठेकेदारांवर थेट कारवाईची गरज आहे. उलट दिड वर्षापासून केवळ त्याची चर्चा होते आहे. रस्त्याचे काम, दर्जा व देखभाल दुरूस्तीवर पालिका, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी गंभीर होण्याची गरज आहे.

Karad Road
'कराड जनता'च्या कर्मचाऱ्यांचा इशारा

याचा सोयीस्कर विसर

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांच्या नावासहित रस्त्याच्या कामाच्या दर्जाचे फ्लेक्स पालिकेच्या प्रवेशव्दारावर लावण्याचीही गर्जना झाली. त्याची जाहीर माहिती नागरीकांना देण्यात येणार होती. नगरपालिका खराब रस्त्यावरील पोतभर खडीही संबंधित ठेकेदारांना भेट म्हणून देणार होती. विशेष सभेत त्यावर चर्चा होवून एकमत झाले. मात्र, एकाही ठेकेदाराबाबत असे काहाही घडले नाही. त्याचा सोयीस्कर विसर पडल्याने त्यांच्या सेटलमेंटची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()