डाळिंबाला अच्छे दिन दिसत असल्याने नवीन शेतकरीही फळबागांकडे वळल्याने डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.
बिजवडी : तेल्या, पिनहोल बोरर, मररोगामुळे डाळिंब (Pomegranate) फळबागांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने डाळिंबाच्या दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही डाळिंबाला अच्छे दिन आले असून, शेतकऱ्यांच्या चांगल्या मालाला जागेवरच दोनशे रुपयांवर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत (Farmers) आनंदाचे वातावरण आहे.