कुडाळ - किसनवीर साखर कारखान्याची सत्ता सभासदांनी मोठ्या विश्वासाने कारखाना बचाव शेतकरी पँनेलकडे दिली आहे, निवडणुकीदरम्यान जावळी तालुक्यातील प्रतापगड कारखाना हा सत्ता आल्यानंतर सन्मानाने प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे व त्यांच्या संचालक मंडळाच्या ताब्यात देऊ असे अभिवचन आमदार मकरंद पाटील यांनी दिले होते त्यानुसार लवकरच दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाला सोबत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तिक बैठक आयोजित करणार असल्याची माहीती सैारभ शिंदे यांनी दिली.
किसनवीर साखर कारखान्याच्या अध्य़क्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने नुतन अध्यक्ष आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांचा सत्कार कारखाना स्थळी करण्यात आला त्यानंतर सैारभ शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहीती दिली. पुढे सैारभ शिंदे म्हणाले, प्रतापगड व किसनवीर कारखान्याच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निवडणुकीपुर्वीच उपमुख्यमंत्री अजीत दादांनी मुंबई मंत्रालय येथे प्रतापगड- किसनवीर संदर्भात बैठक घेतली होती, त्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सातारा जावली आमदार शिवेंद्रराजे भोसले , सहकार व पणन सचीव महाराष्ट्र राज्य, उपस्थित होते.
साखर आयुक्तांनी मध्यस्ती करून हा प्रश्न सोडवुन दोन्ही कारखान्यांची येणे-देणे चा हिशोब करून पुन्हा एकत्रित मिटींग मा.अजीत दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे ठरले होते. मात्र त्यादरम्यान दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सदरची बैठक लांबणीवर पडली होती, आता दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका पार पडल्या असून नुकतीच अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीही झाल्या आहेत. किसनवीर चे अध्यक्ष मकरंद पाटील व संचालक नितिन पाटील यांचे प्रतापगडच्या संचालक मंडळाकडून अभिनंदन करून सत्कार करण्यात आला त्यांनतर झालेल्या बैठकीवेळी संचालक नितिन पाटील यांनी किसनवीरची सत्ता नुकतीच स्थापन झाली असून कारखान्याची सरर्व सूत्रे हाती घेत असताना यापुर्वी प्रतापगड कारखान्याच्या कराराविषयीची विस्तृत माहीती घेऊन दोन्ही कारखान्याचे येणे देणे हिशोब तपासण्याचे काम तात्काळ सूरू करणार असून त्यानुसार येणे देणे निश्चित करून आम्ही निवडणुकी दरम्यान दिलेला शब्द नक्की पाळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच आगामी काळात प्रतापगड व किसनवीर दोन्ही कारखाने पुढच्या गळीत हंगामासाठी सज्ज राहतील त्याबाबत शेतकरी कामगारांनी निश्चिंत रहावे असे आश्वासनही त्यांनी यावेळी प्रतापगडच्या संचालक मंडळाला दिले. यावेळी प्रतापगड उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, राजेंद्र शिंदे, दादा फरांदे,बाळासाहेब निकम, प्रदीप शिंदे, अंकुशराव शिवणकर,प्रदिप तरडे, नाना पवार, आनंदराव मोहिते, विजय शेवते, ज्ञानेश्वर पोफळे, राजेंद्र भिलारे, हिंदुराव तरडे आदी संचालक उपस्थित होते.
लवकरच सर्व प्रश्न सुटतील - सैारभ शिंदे, अध्यक्ष प्रतापगड कारखाना
किसनवीर कारखान्यावर समविचारी लोकांची सत्ता आली असून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड व किसनवीरचे नुतन संचालक मंडळ एकमेकांच्या विचाराने योग्य ती देणे घेणे व आथिर्क व्यवहार पुर्ण करतील व निश्चीतच प्रतापगड व्यवस्थापन येणारा हंगाम स्वबळावर यशस्वी पणे घेईल, आजित दादांच्या मार्गदर्शनाने प्रतापगड सक्षमपणे चालवण्याचा मानस प्रतापगड व्यवस्थापनाचा राहणार आहे. त्यासाठी सर्व लोकप्रतिनीधी, सभासद व कामगारांचे मोलाचे योगदान व पाठबळ लागणार आहे. पुढील कामकाज साखर आयुक्त यांच्या मध्यस्तीने सुरू आहे लवकरच सर्व प्रश्न सुटतील व प्रतापगड पुन्हा जोमाने सुरू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.