सातारा : एसटीत पर्स मी कशी विसरले देव जाणे. पण पैसे कष्टाचे हाेते अन् पाेलिस दादा देवा सारखे धावून आले. त्यामुळे हरविलेल्या लाख माेलाच्या पर्सने गगना एवढा आनंद दिला. कोंडवे येथे राहणा-या विद्या दिलीप निंबाळकर असे सांगत हाेत्या. विद्या या शनिवारी (ता. 21) संध्याकाळी पुण्यावरून सातारा येथे आल्या. प्रवासानंतर घरी गेल्यावर त्यांना पर्स विसरल्याचे लक्षात आले. पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे त्यांना पर्स मिळाल्याने आनंद झाला हाेता.
विद्या निंबाळकर म्हणाल्या मी पुण्याहून साता-याला आले. घरी गेल्यानंतर आपली पर्स बसमध्येच राहिल्याचे लक्षात आले. तेव्हा छातीत धस्स झालं. पण धीर साेडला नाही. पर्ससाठी पुन्हा बस स्थानक गाठले. शाेधा शाेध केली मात्र सापडली नाही. अखेरीस बस स्थानाकातील पोलिस चौकीत धाव घेतली. तेथे उपस्थित असलेल्या पाेलिसांना सांगितले दादा मी काेंडव्यात राहते, पुण्यावरुन आत्ता आले, घरी गेले पण.... पुढची सर्व हकीकत सांगताना मला रडू काेसळले. त्यावर पाेलिसांनी काळजी करु नका तुमची पर्स शाेधूया, मिळेल ती असा धीर दिला. तेथे उपस्थित असलेले हवालदार दत्तात्रय पवार, कॉन्स्टेबल अजयराज देशमुख, कॉन्स्टेबल विलास गेडाम, महिला कॉन्स्टेबल अंजली बामणे यांनी तात्काळ सूत्रे फिरवत पुणे सातारा एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टरचा शाेध घेण्यास प्रारंभ केला.
माेदी सरकारने मला जबरदस्ती निवृत्त केले; IPS अधिका-याचा फाेटाे व्हायरल
ज्यांची माहिती मिळाली त्यांच्या संपर्कात राहून गाडी परत सातारा बसस्थानकात आणण्याची विनंती पाेलिसांनी केली. गाडी येताच मी धावत सुटले. पाेलिसांनी गाडीची झडती घेतली. त्यावेळी मागील बाजूस पर्स दिसून आली. मला ही पर्स दिसताच आनंद झाला. पाेलिसांनी त्यामधील सोन्याचे दागिने, पैसे सर्व काही सुरक्षित असल्याचे मला सांगतिले. आपली पर्स जशीच्या तशी आहे असे एेकताच मला पुन्हा रडू काेसळले अर्थाच ते आनंदाश्रु हाेते.
त्यानंतर पोलिसांनी मला चाैकीत नेऊन माझी पर्स मला परत केली. बसचे ड्रायव्हर, कंडक्टर, पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे कष्टाची कमाई पुन्हा आपल्याला मिळाल्याचा आनंद शब्दांत सांगता येत नव्हता. अखेरीस मी सर्वांचे आभार मानून घर गाठले.
आम्ही नेहमीप्रमाणे पाेलिस चाैकीत ड्युटीला हाेता. विद्या ताईंनी आम्हांला त्यांची पर्स हरविल्याचे सांगितले. एसटी महामंडळाच्या अधिका-यांनी तपास करण्यात मदत केली.
तब्बल एक लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल पर्समध्ये हाेता. ताे पुन्हा त्यांना परत केल्याचा आनंद वाटत आहे.
- दत्ता पवार, हवालदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.