'दोघेही जवळचे मित्र'; निवडणुकीत भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देणार?

Political News
Political Newsesakal
Updated on
Summary

भाजपच्या प्रदेश सरचिटणीसांनी केलेल्या सूतोवाचामुळे खळबळ उडालीय.

कऱ्हाड (सातारा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक (Satara Bank Election) शिखर संस्था आहे. तेथे योग्य लोक निवडून जावेत, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी निवडणुकीसंदर्भात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पक्ष विचारांच्या लोकांची बैठक घेऊन सोसायटी मतदारसंघाचा निर्णय घेऊ. पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) सन्माननीय आहेत, तर उदयदादा जवळचे मित्र होते. त्यामुळे दोघांचे काय करायचे, सोसायटी मतदारसंघात काय भूमिका घ्यायची, ते योग्य वेळीच ठरवू, अशी भूमिका भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले (BJP leader Atul Bhosale) यांनी आज पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.

Political News
बस्स झालं! आता पोपटपंची बंद करा; NCP ची सेनेच्या आमदारावर सडकून टीका

श्री. भोसले यांनी केलेल्या सूतोवाचामुळे जिल्हा बँकेच्या गोटात खळबळ उडाली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून नक्की काय भूमिका राहणार, या प्रश्नावर ते बोलत होते. श्री. भोसले म्हणाले, ‘‘जिल्हा बँक निवडणुकीत सोयीची भूमिका घेण्याऐवजी परिस्थितीनुसार काय भूमिका घायची, हे योग्य वेळी ठरविले जाईल. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे बंधू माझे चांगले मित्र असून, त्यांच्या गटाशी आमची पूर्वी सलगी होती.

Political News
शेतकऱ्याला नागवं करण्याचं पाप संचालकांनी केलंय; उदयनराजेंचा संताप

अॅड. उदयसिंह पाटील यांच्या गटाशी आमच्या गटाची यापूर्वी सलगी होती; परंतु ती आता काही कारणांनी राहिली नाही. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत एक मतदार या नात्याने आम्ही आमची भूमिका घेणार असून, ती योग्य वेळी जाहीर करणार आहे. त्याबरोबर जिल्हा बँकेला आम्ही ज्याला मदत करू, तो उमेदवार नक्कीच निवडून येऊ शकतो.’’

Political News
फक्त दोन जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात; महिला गटांत मोठी चुरस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()