Satara : छ. शिवाजी महाराज पुतळा परिसरात काही करण्याचं धाडस करू नका; पालकमंत्र्यांना स्पष्ट इशारा

पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा परिसर सर्वांचे प्रेरणास्थान आहे.
Powai Naka Chhatrapati Shivaji Maharaj statue
Powai Naka Chhatrapati Shivaji Maharaj statueesakal
Updated on
Summary

पोवई नाका परिसरात लोकनेते स्‍वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्‍या नावे चौक विकसित करून सुशोभीकरणाचे काम करण्‍यात येणार आहे.

सातारा : पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा परिसर सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे. शिवप्रभूंपेक्षा दिगंत कीर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल, असे वाटत नाही.

याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणी धाडस करू नये. अधिकार गाजवून, तमाम जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हीन प्रकार केल्‍यास तो जनतेच्या माध्यमातून हाणून पाडला जाईल, असा इशारा माजी नगराध्यक्षा रंजना रावत यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

पोवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सर्वांचे आकर्षण आहे. या परिसराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेच्या माध्यमातून सुशोभीकरण होत आहे. या परिसराचे नामकरण करत त्‍याठिकाणी आयलँड करण्याचा प्रयत्‍न काही जणांकडून सुरू आहे. लोककल्याणकारी शिवप्रभूंची तुलना अन्य कोणाशी होऊ शकणार नाही व तसा प्रयत्नही कोणी करू नये.

Powai Naka Chhatrapati Shivaji Maharaj statue
Koregaon : मस्तीचा बैल चालत नसतो, त्याला वेसण..; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा कोणाला इशारा?

मंगळवारी कल्पनाराजे भोसले यांनी शिवस्मारक परिसराची पाहणी करत कामाच्‍या अनुषंगाने संबंधित यंत्रणांना सूचना केल्‍या आहेत. या परिसरालगत छत्रपती संभाजी महाराज आणि शाहूनगरीचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची स्मारके उभारण्याची त्‍यांची संकल्पना असल्‍याची माहितीही रंजना रावत यांनी पत्रकात दिली आहे.

Powai Naka Chhatrapati Shivaji Maharaj statue
Kagal : आक्षेपार्ह स्टेटसमुळं कागलमध्ये तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांचं शांततेचं आवाहन

पोवई नाक्‍यावर होणार बाळासाहेब देसाई चौक

पोवई नाका परिसरात लोकनेते स्‍वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्‍या नावे चौक विकसित करून सुशोभीकरणाचे काम करण्‍यात येणार आहे. यासाठीची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १६) जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे.

पोवई नाका परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळा परिसराचे सुशोभीकरण आणि त्‍यासाठी आणलेल्‍या निधीच्‍या कारणावरून खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यात श्रेयवाद रंगला आहे. हा वाद रंगात असतानाच त्‍या परिसरात आयलँड विकसित करत ‍याठिकाणी बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्‍यासाठीची बैठक होत आहे. याबाबतची विषयपत्रिका समाजमाध्‍यमांवर फिरत असून, त्‍याबाबत शिवप्रेमींनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.