सत्तेच्या चाव्या पुन्हा अपक्षांच्या हाती; भाजपला सहा, राष्ट्रवादीला पाच जागा

nagar panchayat election
nagar panchayat electionsakal
Updated on

वडूज : येथील नगरपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला सहा जागा, राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या तर काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी एक जागा मिळाली तर नगरपंचायतीत चार अपक्ष उमेदवार निवडून आल्याने सत्तेच्या चाव्या पुन्हा अपक्षांच्या हाती राहील्या आहेत.

नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक (Election) झाली होती. त्यासाठी एकूण ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूकीत आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलचे सहा उमेदवार निवडून आले आहेत. गत निवडणूकीत भाजपने असणाऱ्या तीन उमेदवारांच्या संख्याबळात वाढ करीत या निवडणूकीत मात्र भाजपाने सहा जागा मिळविल्या आहेत. (Nagar Panchayat Election in satara)

nagar panchayat election
मुंबई बॉम्बस्फोट : गुन्हेगारांना सरकारी सुरक्षा, हॉटेल्सचा पाहुणचार?

निवृत्त विभागीय आयुक्त व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविली. त्यामध्ये राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या आहेत. गत निवडणूकीत राष्ट्रवादीचे पाच उमेदवार होते. निवडणूकीसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा होती मात्र ही युती न झाल्याने दोघांनीही स्वबळाचा नारा देत निवडणूक लढविली. त्यामुळे राष्ट्रवादीने ऐनवेळी स्वबळावर तयारी करून कमी जागा लढवून चांगले यश मिळविले आहे. काँग्रेसने हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निवडणूक लढविली. प्रभाग क्रमांक चार चा अपवाद वगळता इतर सर्व १६ प्रभागांत उमेदवार उभे करून प्रचाराचा चांगला धडका उडविला होता, मात्र काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

nagar panchayat election
Nagar Panchayat Election: नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष

वंचित बहुजन आघाडीने निवडणूकीत पहिल्यांदाच शड्डू ठोकला होता. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शोभा दिपक बडेकर यांच्या विजयाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचा नगरपंचायतीत चंचूप्रवेश झाला आहे. नगरपंचायतीत चार अपक्षांनी विजय मिळविला आहे. याशिवाय शिवसेनेसह प्रस्थापित काही नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.नगरपंचायतीत चार अपक्ष निवडणून आल्याने सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तेसाठी भाजप अपक्षांचे पाठबळ घेण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी व काँग्रेसदेखील युती साधत अपक्षांचे पाठबळ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्षांचे पाठबळ भाजपला की काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला राहणार हे येणारा काळच ठरविणार आहे.

पुन्हा दिर भावजयी विजयी...

गत नगरपंचायत निवडणूकीत माजी नगराध्यक्षा सौ. शोभा माळी व त्यांचे दिर अनिल माळी हे विजयी झाले होते. या निवडणूकीत मात्र सौ. माळी यांचे पती सचिन माळी व श्री. अनिल माळी यांच्या पत्नी सौ. रेखा माळी, तसेच माजी उपनगराध्यक्षा सौ. किशोरी पाटील यांचे दिर जयवंत पाटील हे निवडून आले आहेत. त्यामुळे निवडणूकीत पुन्हा दिर भावजयी विजयी झाल्याचे दिसून आले.

nagar panchayat election
नगरपंचायत निवडणुकीतही भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला - चंद्रकांत पाटील

पती - पत्नींचा विजय..

गत निवडणूकीत शुभांगी सोमनाथ जाधव या विजयी झाल्या होत्या. या निवडणूकीत त्यांचे पती सोमनाथ जाधव हे तर माजी स्विकृत नगरसेवक श्रीकांत उर्फ काकासाहेब बनसोडे यांच्या पत्नी सौ. रेश्मा बनसोडे या विजयी झाल्या. याशिवाय स्विकृत नगरसेवक अभयकुमार देशमुख हे विजयी झाले.

नवख्या चेहऱ्यांना मतदारांनी दिली संधी.

नगरपंचायत निवडणूकीत प्रस्थापित काही नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले होते. तर त्यांच्या विरोधात अनेक नवख्या चेहऱ्यांनीदेखील शड्डू ठोकला होता. त्यामुळे निवडणूक रंगतदार झाली होती. निवडणूकीत प्रस्थापित नगरसेवकांच्या कुटूंबातील सात उमेदवारांचा विजय झाला आहे. तर दहा ठिकाणी नवख्या चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.