कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड येथील विमानतळ हे अतिमहत्वाचे ठिकाण आहे. असे असतानाही ते कालपासून अंधारातच आहे. तेथील वीज पुरवठा खंडित झाला असून त्यासंदर्भात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही त्यांनी वीज पुरवठा (Power supply) पूर्ववत केला नसल्याचे विमानतळ (Karad Airport) प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अतिमहत्वाचे ठिकाणी दोन दिवसांपासून अंधारातच राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Power Supply Has Stoped From Two Days Of Karad Airport Satara Marathi News)
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना येथे विमानतळ सुरु करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी मुख्यमंत्री असताना येथे विमानतळ सुरु करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील ते एकमेव विमानतळ आहे. त्या विमानतळाचा मंत्री, खासदार, आमदार यासह उद्योजक वापर करतात. सध्या त्या विमानतळावरुन वाहतूक कमी असली तरी आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) मुख्यमंत्री असताना त्याचा सातत्याने वापर झाला. त्याचबरोबर हजारमाचीला होणारे भूकंप संशोधन केंद्र (Earthquake Research Center), पुणे-बेंगळुरु महामार्गाजवळ असणारे ठिकाण, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारे ठिकाण म्हणून कऱ्हाडची ओळख असल्याने आमदार चव्हाण यांनी विमानतळ विस्तारीकरणाची प्रयोजन केले आहे.
त्यामुळे येथील विमानतळ हे शासनाच्या अतिमहत्वाच्या ठिकाणांच्या यादीत आहे. मात्र, हे ठिकाण दोन दिवसांपासून अंधारत आहे. त्यासंदर्भात विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई यांनी महावितरणशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही काहीच कार्यवाही झालेली नाही. अतिमहत्वाचे ठिकाणी असूनही ते अंधारातच राहिल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे.
कऱ्हाड विमानतळ अतिमहत्वाचे ठिकाण असूनही शुक्रवार दुपार पासून लाईट नाही. त्यासंदर्भात महावितरणला कळवूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्याची माहिती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना दिली आहे.
-कृणाल देसाई, विमानतळ व्यवस्थापक, कऱ्हाड
Power Supply Has Stoped From Two Days Of Karad Airport Satara Marathi News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.