'मी विधानसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा'; शरद पवार गटातील नेत्याचं भाजप आमदाराला खुलं आव्हान

धैर्यशील मोहिते-पाटील यांना खासदार होऊन फक्त दोन महिनेच झालेत. दोन महिन्यांत त्यांना जनतेचं दुःख समजलंय.
Prabhakar Deshmukh vs Jaykumar Gore
Prabhakar Deshmukh vs Jaykumar Goreesakal
Updated on
Summary

पाण्याच्या कामाला चालना देत असलेल्या खासदारांवर टीका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये, असा टोलाही देशमुख यांनी लगावला.

दहिवडी : धैर्यशील मोहिते-पाटील यांना खासदार होऊन फक्त दोन महिनेच झालेत. दोन महिन्यांत त्यांना जनतेचं दुःख समजलंय. मात्र, पंधरा वर्षे आमदार असलेल्या माणसाला हे समजलं नाही, हे दुर्दैव आहे. खरंतर खासदारांना नाही, तर झोपी गेलेल्या तुम्हालाच जागे होण्याची, आत्मपरीक्षणाची गरज आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना लगावला.

दहिवडी येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, भालचंद्र कदम, अॅड. संतोष पवार, हर्षदा देशमुख-जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Prabhakar Deshmukh vs Jaykumar Gore
'मनोज जरांगेंचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, ते फडणवीसांवर..'; गंभीर आरोप करत प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

देशमुख म्हणाले, ‘‘माण-खटावला २००९ पूर्वी जेवढे पाणी मिळाले, त्यातील तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतोय. आपल्या हक्काचे दोन हिस्से पाणी सांगली व सोलापूरला जात आहे. १९९७ मध्‍ये जिहे-कठापूर योजना मंजूर झाली. पाणी आरक्षित झाले; पण पाणी यायला मात्र २०२४ वर्ष उजडावे लागले. दुष्काळी कालावधीत आंधळी तसेच येरळवाडीत हे पाणी येणे, आंधळीत आलेले पाणी माण नदीत सोडणे आवश्यक होते. दुर्दैवाने हे पाणी माण नदीत सोडले नाही. हे पाणी सोडले असते, तर दुष्काळाची दाहकता अन्‌ लोकांचे अश्रू थांबले असते.’’

देशमुख पुढे म्हणाले, ‘‘२०१९ च्या निवडणुकीवेळी बिजवडी येथे आमदारांनी सहा महिन्यांत पाणी इकडे आले नाही, तर राजीनामा देईन, असं जाहीर केले होते. सहा महिन्यांत सोडा, पाच वर्षांत ते पाणी आलं नाही आणि आता ते पाणी पुढच्या पाच वर्षांत या भागात फिरेल, हे सांगण्यात येतेय. पंधरा वर्षे झोपलेल्या अवस्थेत असलेल्यांनी पंधरा वर्षांत जिहे-कठापूरचे पाणी माण नदीत का सोडले नाही? आता ते पाणी हिंगणीपर्यंत कधी येणार? वितरण व्यवस्था कशी होणार आहे? खासदारांना त्‍यांच्‍या दौऱ्यादरम्‍यान शेतकऱ्यांनी ज्या अडचणी सांगितल्या, त्या सोडविण्यासाठी त्यांनी बैठक घेतली. सूचना केल्या. खासदारांनी दोन महिन्यांत जे काम केलेय, त्याबद्दल राजकारणापलीकडे जाऊन त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत.’’

Prabhakar Deshmukh vs Jaykumar Gore
'ज्येष्ठ नेते शरद पवार, मनोज जरांगे, लक्ष्मण हाकेंनी राजकारण करू नये'; आरक्षणावरुन उदयनराजेंचं स्पष्ट मत

आधी खुलासा करा

दीपक देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. दोनशे मृतांवर उपचार केल्याचे दाखवून त्याचे पैसे हडपणे आणि ते प्रकरण उच्च न्यायालयात जाणे याबद्दल त्यांनी खुलासा करावा. पाण्याच्या कामाला चालना देत असलेल्या खासदारांवर टीका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये, असा टोलाही श्री. देशमुख यांनी लगावला.

मी लढणार आणि जिंकणार सुद्धा

माण विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे आणि मी निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे. याबाबत आपण सर्वांनी निश्चिंत राहा, असा ठाम विश्वास प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.