प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून साताऱ्यातील गर्भवतींसाठी दाेन काेटी 74 लाखांचा निधी

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून साताऱ्यातील गर्भवतींसाठी दाेन काेटी 74 लाखांचा निधी
Updated on

सातारा : कोरोनाच्या प्रतिकूल स्थितीतही प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत दोन कोटी 74 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात 27 कोटी 72 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहेत.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी ही माहिती दिली. केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2017 पासून सुरू करण्यात आली असून, या योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या बुडीत रोजगाराची प्रतिपूर्ती आणि गरोदरपणाच्या कालावधीत मातेला आराम मिळावा, तसेच सुयोग्य आहार मिळावा, याकरिता पाच हजारांचा लाभ देण्यात येतो. सर्व प्रवर्गातील व सर्व आर्थिक स्तरांमधील लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र, हा लाभ कोणत्याही शासकीय सेवेतील अधिकारी वा कर्मचाऱ्यांना मिळत नाही.

नॉन कोविड रूग्णांची मोठ्या रूग्णालयांकडे पाठ, जाणून घ्या त्या मागचं नेमकं कारण

जिल्ह्यात 25 ऑगस्ट 2020 पर्यंत एकूण 65,689 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्ये एकूण 27 कोटी 72 लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. जिल्ह्यात ज्या कालावधीत पूर्णपणे लॉकडाउन होते. त्या कालावधीतही या योजनेमध्ये 5934 इतक्‍या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2 कोटी 74 लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

उन्हाळ कांद्याच्या भावामध्ये क्विंटलला २०० रुपयांनी वाढ
 
लाभार्थ्यांना त्यांची गरोदरपणाची नोंदणी 100 दिवसांच्या आत आशा कार्यकर्ती किंवा आरोग्य सेविकेकडे करणे बंधनकारक असते. तालुकानिहाय लाभार्थी नोंदणी व अनुदान वाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. जावळी 2479 (एक कोटी 7 लाख), कऱ्हाड 11,160 (चार कोटी 99 लाख), खंडाळा 3013 (एक कोटी 9 लाख), खटाव 6242 (दोन कोटी 45 लाख), कोरेगाव 6083 (दोन कोटी 65 लाख), महाबळेश्‍वर 880 (33 लाख 73 हजार), माण 4557 ( एक कोटी 79 लाख), पाटण 7833 (तीन कोटी 43 लाख), फलटण 5782 (दोन कोटी 27 लाख), सातारा 8864 (तीन कोटी 75 लाख), वाई 1270 (एक कोटी 86 लाख), कऱ्हाड शहर 140 (52 लाख), महाबळेश्वर शहर 975 ( पाच लाख 61 हजार), पाटण शहर 1953 ( 42 लाख 85 हजार), सातारा शहर 357 (83 लाख 8 हजार), वाई शहर 4101 (13 लाख 37 हजार) एकूण 65689 (27 कोटी 72 लाख).

दुष्काळी तालुक्‍यात पाऊस मोठा; तरीही जलसाठ्यात पाण्याचा तोटा  

लाभार्थ्यांनी सर्व आवश्‍यक कागपत्राची पूर्तता वेळेत करावी. त्यामुळे योजनेचा उद्देश साध्य होईल, जिल्हा कार्यक्रम समन्वयक सतीश साळुंके यांनी सांगितले. खासगी रुग्णालयात जाणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतःची नोंदणी शासकीय आरोग्य संस्थेत करून घ्यावी. त्यांची नोंदणी या योजनेमध्ये होईल. त्यांना याचा लाभ घेणे सोईचे होईल, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; वडूजला पदे रिक्त  

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नवसंजीवनी ठरत असून, जास्तीतजास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.