रहिमतपूर - आपल्या गावाचे नामांतर झाले आहे. आजपासून जयपूर या नावाने ओळख झाली आहे. परंतु, फक्त नामांतरावर समाधान मानू नका. या नावाला साजेसे समाजकाम, विकासकाम करून सातारा जिल्ह्यात जयजयकार झाला पाहिजे, असे काम करा. त्यासाठी लागेल ती मदत खासदार फंड व सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येईल, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक या गावचे नाव बदलून जयपूर हे करण्यात आले. त्यावेळी खासदार पाटील बोलत होते. यावेळी तहसीलदार अमोल कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, संभाजीराव गायकवाड, कांतीलाल पाटील, वसंतराव कणसे, आण्णासाहेब निकम, भागवत घाडगे, सारंग पाटील, जितेंद्र भोसले, प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष माने म्हणाले, ‘‘गावचे नाव बदलण्यासाठी खासदार पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. राजस्थानमधील जयपूरसारखा गावाचा विकास घडवूया.’’ या वेळी राजाभाऊ जगदाळे, भीमराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दीपक साबळे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी गावातील नामांतर समिती अध्यक्ष नंदकुमार माने, सदस्य विकास निकम, विष्णूदास सुर्वे, तानाजी साळुंके, धनाजी फडतरे, शंकर कोकीळ, अशोक माने, महेश दळवी, गणेश फडतरे, संदीप सुभाष निकम यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने खासदार पाटील यांनी केला.
दरम्यान, गावचे नामांतर होत ‘जयपूर’ करण्यात आले. या आनंदोत्सवात संपूर्ण गावात गुढीतोरणे उभारून रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. नामांतरासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल खासदार पाटील, सरपंच प्रियांका माने यांची गावात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.