Primary Teachers Bank News : शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच कर्ज वसुली?

कर्जातून पाच टक्के भाग भांडवलाची रक्कम व दोन महिन्यांचे व्याज हे मंजूर रकमेतून आधीच रोख वसूल केले जात आहेत.
education problem news
education problem newsSakal
Updated on
Summary

सध्या अनेक प्राथमिक शिक्षकांची पाल्ये उच्च शिक्षण घेत आहेत. यात वैद्यकीय, इंजिनिअर, आयटी व इतर विभागात प्रवेश घेत आहे.

खंडाळा : प्राथमिक शिक्षकांची तारणहार ठरलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नियमाप्रमाणे पाल्यांनी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाची पूर्ण रक्कम अदा न करता शेअर्स, व्याज व आगाऊ दोन हप्ते मंजूर रकमेतून लाखापर्यंत कपात करण्यात येत आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालकांची त्रेधातिरपीट होत आहे.

सध्या अनेक प्राथमिक शिक्षकांची पाल्ये उच्च शिक्षण घेत आहेत. यात वैद्यकीय, इंजिनिअर, आयटी व इतर विभागात प्रवेश घेत आहे. यावेळी खासगी किंवा इतर शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेताना ४० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज या बॅंकेत मंजूर होत आहे.

या कर्जातून पाच टक्के भाग भांडवलाची रक्कम व दोन महिन्यांचे व्याज हे मंजूर रकमेतून आधीच रोख वसूल केले जात आहेत. मात्र, फी भरताना पूर्ण रक्कम भरावी लागते. परिणामी, कर्ज काढूनही उर्वरित रकमेसाठी पळापळ करावी लागत आहे.

यामध्ये बॅंकेने उचलप्रमाणे शेअर्स रक्कम कपात करावी, असा नियम सध्या लावला आहे. मात्र, पूर्ण उचल घेईपर्यंत शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी उर्वरित रकमेसाठी धावपळ करावी लागत आहे.

education problem news
Satara Assembly Election 2024 : सातारा-जावळीत ६३.५२ टक्के मतदान; सकाळी केंद्रावर गर्दी

एका वर्षापूर्वी याबाबत बँकेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी तत्काळ कारवाई करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही यावर कारवाई झाली नाही. तरी विद्यार्थी शिक्षणक्रमात खंड पडू नये, म्हणून याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

education problem news
Maharashtra Exit Poll : महाराष्ट्रात कुणाची येणार सत्ता? इथे पाहा

सभेत चर्चा...

दरम्यान, याबाबत बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आगामी सभेत त्यावर चर्चा घडवून आणणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.