'काहीही झालं तरी भाजपला रोखायचंय, त्यासाठी कोणाशीही..'

'विश्वासघात, दिशाभूल करणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावा लागला होता.'
पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाणSakal
Updated on
Summary

लोणंद (सातारा) : लोणंद शहराच्या विकासासाठी कॉंग्रेसला (Congress) एक हती सत्ता देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले. लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या (Lonand Nagar Panchayat Election) पार्श्वभूमीवर येथे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र डोईफोडे, खंडाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सर्फराज बागवान, खंडाळा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शैलजा खरात, सोपानराव क्षीरसागर, दत्तात्रय खरात, अॅड. हेमंत खरात, रमेश कर्नवर, अॅड. बबलूभाई मणेर, इम्रान बागवान, प्रवीण डोईफोडे, इक्बाल बागवान आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘‘लोणंद नगरपंचायतीची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल. सर्वच्या सर्व १७ जागांवर ताकदीचे, सुशिक्षित, तसेच जनमानसात चांगले स्थान असणारे उमेदवार द्या. काहीही झाले तरी भाजपला रोखायचे आहे. त्यासाठी कोणाशीही स्थानिक आघाडी केली जाणार नाही. खंडाळा कारखान्याच्या बाबतीत विश्वासघात झाल्याने विश्वासघात व सभासदांची दिशाभूल करणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावा लागला होता. तो निर्णय कॉँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पाळल्याने जे अपेक्षित होते ते घडले.

पृथ्वीराज चव्हाण
काही तरी इतिहास घडेल आणि ठाकरे सरकार पडेल; रामदास आठवलेंचा दावा
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

मात्र, तो निर्णय त्या निवडणुकीपुरताच होता. आता कोणाशी स्थानिक आघाडी होणार नाही. (कै.) अॅड. बाळासाहेब बागवान यांनी लोणंदनगरीचे पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत.’’ सर्फराज बागवान म्हणाले, ‘‘वडील (कै.) अॅड. बाळासाहेब बागवान यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोणंद नगरपंचायतीची ही निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी केली आहे.’’ दादासाहेब शेळके-पाटील, निसार आतार, म्हस्कूअण्णा शेळके- पाटील यांचीही भाषणे झाली. तारिक बागवान यांनी सूत्रसंचालन केले.

पृथ्वीराज चव्हाण
'भाजपकडून मला आमदारकीसाठी तिकीट देण्याची ऑफर'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.