मी बाेलेन मुख्यमंत्र्याशी; काॅंग्रेस नेत्याने व्यापा-यांना दिले आश्वासन

मी बाेलेन मुख्यमंत्र्याशी; काॅंग्रेस नेत्याने व्यापा-यांना दिले आश्वासन
Updated on

कऱ्हाड : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साेमवारी रात्री काढलेल्या लाॅकडाउनच्या आदेशाच्या विरोधात शहरातील व्यापारी आज (मंगळवार) रस्त्यावर उतरले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफ, कापड, हार्डवेअर, हाॅटेल व्यावसायिकांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यापूर्वीच्या लाॅकडाउनमुळे व्यापाराचे कंबरडे मोडले आहे. त्यात नव्याने लाॅकडाऊन झाल्याने व्यवसायिक पूर्ण बरबाद होणार आहे. तरी लाॅकडाउनमध्ये शिथिलता द्यावी, अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांनी केली. 

व्यापाऱ्यांतर्फे जितेंद्र ओसवाल, नितीन ओसवाल, चेतन मेहता, राहुल शहा, अमीत पाटणकर , बाळासाहेब भंडारी, मोहसीन बागवान, अशिर बागवान, अंकुर ओसवाल यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 30 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे आदेश जारी केला. त्यामुळे व्यापाऱ्यांत तीव्र नाराजी परसली आहे. त्यामुळे त्यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. दुकाने काही वेळ सुरू ठेवण्यास सवलत मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केली. 

असं मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बर; व्यापा-यांची भावना समजून घ्या : शिवेंद्रसिंहराजे 

कोरोना काळात व्यापाऱ्यांनी साथ दिली. दोन महिन्यांपासून आर्थिक स्थिती सुधारताना पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांसह दुकानातील कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शुक्रवार ते रविवार दुकाने बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होता. असे असताना संपूर्ण आठवडाभर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अचानक दिल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांना रोज दुकाने काही वेळ सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांच्या भावना पाहून आमदार चव्हाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले. 

आजपासून 30 एप्रिलपर्यंत पुकारलेल्या बंदला येथे विरोध झाला. आपले म्हणणे मांडण्यासाठी व्यापारी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भेटले. आमदार चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. तरीही त्यांनी व्यापाऱ्यांना भेट दिली. आमदार चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयात नुकतीच लस घेतली आहे. त्यामुळे त्यांना थोडसा त्रास होत असूनही त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.