Satara : 'राजकारण्यांनो.. मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देऊ नका, अन्यथा तुम्हाला मतदान करणार नाही'

आरक्षण हा गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही, हे राजकारण्यांनी लक्षात घ्यावे. मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देऊ नयेत.
Maratha Reservation
Maratha Reservationesakal
Updated on
Summary

आमच्या मागणीचा विचार केला नाही तर ओबीसी समाज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, तसेच ओबीसी समाज तुम्हाला मतदान करणार नाही, असा इशारा दिला आहे.

सातारा : मराठा समाजाला (Maratha Community) कोणत्याच आयोगाने सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागास असल्याचे म्हटलेले नाही. न्यायालयानेही मराठा समाजाचे आरक्षण नाकारलेले असताना ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देऊ नये, या मागणीसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

जिल्हा ओबीसी संघटनेचे (OBC Association) अध्यक्ष भरत लोकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्याध्यक्ष संजय पोतदार, महासचिव प्रमोद क्षीरसागर, रामचंद्र वनवडे, भानुदास वास्के, संजय पोतदार, सुनीता दीक्षित, श्रीकांत आंबेकर, संजय परदेशी, अनिल लोहार, चंद्रकांत सुतार, डॉ. मकरंद पोरे, राहुल कुंभार, राजेंद्र चोरगे, मुरलीधर पवार, मोहनराव टोणपे, लक्ष्मण वीर, विश्‍वास सावंत, दत्तात्रय यादव, अरुणा यादव आदी सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Maratha Reservation
Indian Army : 11 महिन्याच्या बाळाचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच जवान सूरज यादव यांचं निधन, गावावर शोककळा

यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे, की शासनाने मराठा समाजाला ओबीसीमध्ये न घालता त्यांच्या विकासासाठी इतर योजना राबवाव्यात. आरक्षण हा गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही, हे राजकारण्यांनी लक्षात घ्यावे. मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देऊ नयेत. आमच्या मागणीचा विचार केला नाही तर ओबीसी समाज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, तसेच ओबीसी समाज तुम्हाला मतदान करणार नाही, असा इशारा दिला आहे.

Maratha Reservation
मिरज पुन्हा हादरलं! पूर्ववैमनस्यातून चुलत भावाचा खून, तर उसन्या पैशावरुन भाजीविक्रेत्याला भोसकलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()