बाॅंबचा काही भाग मुंबईच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेत रवाना

पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी तांबवे येथील घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक पेंडकर यांच्यासह सात कर्मचारी तेथे आले होते.
pune ats
pune atssystem
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : कोयना नदीच्या (koyna river) तांबवे पुलाखाली सापडलेल्या हॅंड ग्रेनेड बॉंबच्या (hand grenade bomb) घटनास्थळाची पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Pune Anti Terrorism Squad) मंगळवारी पाहणी केली. पथकाचे पोलिस निरीक्षक पी. एस. पेंडकर व त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनी येथे भेट देऊन माहिती घेतली. (pune anti terrorism squad in karad bomb enquiry)

तांबवेच्या पुलासह बॉंब निकामी केलेल्या जागेचीही त्यांनी चौकशी केली. पोलिसांनी तयार केलेल्या कागदपत्रांचीही त्यांनी माहिती घेतली. निकामी केलेल्या बॉंबचे काही भाग पोलिसांनी मुंबईच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

pune ats
Coronavirus : साताऱ्यात आज लसीकरण राहणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण

तांबवे येथील कोयना नदीवर जुन्या पुलाखालील नदीपात्रात सैन्यातील तीन जीवंत हॅंड ग्रेनेड बॉंब सापडले. साकुर्डीचे संभाजी चव्हाण, अरुण मदने व योगेश जाधव हे तीन युवक मासेमारी करताना त्यांच्या गळाला प्लॅस्टिकची पिशवी लागली. ती पिशवी उत्सुकतेपोटी युवकांनी उघडली. त्या वेळी त्यात बॉंबसदृश वस्तू होत्या. त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस अधीक्षक अजकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, बाळासाहेब भरणे यांनी भेट दिली. त्या वेळी जिल्हा दहशतवाद विरोधी पथकासह बॉंबशोधक व नाशक पथक तेथे आले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास बॉंब निकामी केले.

pune ats
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक प्रक्रिया तूर्तास थांबली

पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी तांबवे येथील घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक पेंडकर यांच्यासह सात कर्मचारी तेथे आले होते. त्यांनी बॉंब सापडला त्या ठिकाणासह बॉंब निकामी केलेली जागा पाहिली. त्या वेळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित युवकांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर बॉंबच्या तपासाची माहिती घेतली. काही कागदपत्रेही त्यांनी पाहिली. तासाभराची माहिती घेऊन पथक पुण्याला रवाना झाले. बॉंब निकामी केला आहे. त्या ठिकाण बॉंबचे काही भाग मुंबईच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविले आहेत अशी माहिती पाेलिस यंत्रणेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.