पुसेसावळी दंगलीत ठार झालेल्या नूरहसन शिकलगारच्या कुटुंबीयांची पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली भेट; म्हणाले, दंगल पूर्वनियोजित की..

'स्वातंत्र्यसैनिकांच्या गावात घडलेली दंगलीसारखी घटना निश्चितच दुर्दैवी आहे.'
Prithviraj Chavan met Shikalgar Family
Prithviraj Chavan met Shikalgar Familyesakal
Updated on
Summary

'घडलेली घटना पूर्वनियोजित आहे की नाही, याचा तपास पोलिस प्रशासन करीत आहे.'

राजाचे कुर्ले : पुसेसावळी (Pusesawali Riots) गावाला स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास असून, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात या गावाचे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या गावात घडलेली दंगलीसारखी घटना निश्चितच दुर्दैवी असून, सरकारने या घटनेची चौकशी निपक्षपातीपणे करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Prithviraj Chavan met Shikalgar Family
पुसेसावळी दंगलीचे ठोस पुरावे न्‍यायालयात सादर करणार; पोलिस अधीक्षकांनी दिली महत्त्वाची अपडेट, मुस्लिम बांधवांना मिळणार न्याय?

पुसेसावळीतील घटनेत मृत्यू झालेल्या नूरहसन शिकलगार (Noorhasan Shikalgar) यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या आई-वडील, पत्नीची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. या वेळी जखमींची विचारपूस व गावातील प्रमुख व्यक्तींची भेटप्रसंगी ते (Prithviraj Chavan) बोलत होते.

या वेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग राज्य उपाध्यक्ष झाकिर पठाण, फारुक पटवेकर, सुरेश पाटील, दत्तात्रय रुद्रुके आदी उपस्थित होते.

Pusesawali Riots congress leader Prithviraj Chavan
Pusesawali Riots congress leader Prithviraj Chavanesakal

आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘घडलेली घटना पूर्वनियोजित आहे की नाही, याचा तपास पोलिस प्रशासन करीत असून, याप्रकरणी व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेज पुराव्याकामी उपलब्ध असून, चौकशीचा देखावा न करता लोकांमध्ये विश्वास निर्माण करून याचा योग्य तपास करून घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांना शिक्षा व्हावी, अशी विनंती सरकारला केली.’’

Prithviraj Chavan met Shikalgar Family
'199 वर्षांनी शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात येणार'; शिवेंद्रराजेंच्या 'या' मागणीला मुनगंटीवारांची संमती

आमदार चव्हाण यांनी पुसेसावळीत घडलेल्या दंगल घटनेप्रकरणी ग्रामपंचायतीत गावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. गावातील लोकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करून बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करावे, पुसेसावळीची बाजारपेठ जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेपैकी एक असून, त्यामुळे ग्रामस्थांनी गावात शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केली.

Prithviraj Chavan met Shikalgar Family
Konkan Politics : शरद पवारांच्या आशीर्वादाने 'या' जागा आम्ही निश्चित जिंकू; आमदार भास्कर जाधवांना विश्वास

या वेळी उपसरपंच राजू कदम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अरविंद लवळे, अध्यक्ष रवींद्र कदम, सोसायटीचे अध्यक्ष रवी कदम, पोलिस पाटील सूरज दळवी, उपसरपंच विजय कदम आदींसह दोन्ही समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.