Pusesawali Riots : पुसेसावळीत मोठी दंगल; विक्रम पावसकरांच्या अटकेसाठी अल्पसंख्याक बांधव रस्त्यावर, भाजप नेत्यावर काय आहे आरोप?

सामाजिक शांतता धोक्‍यात आणण्‍यासाठीचा कट आठ दिवसांपासून रचण्‍यात येत होता.
Pusesawali Riots
Pusesawali Riotsesakal
Updated on
Summary

सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलिस व प्रशासनास सहकार्य करावे.

सातारा : पुसेसावळी येथे (Pusesawali Riots) झालेल्‍या हल्ल्‍यात मृत झालेल्‍या नूरहसन शिकलगार यांच्‍या मृत्‍यूप्रकरणी भाजपचे प्रदेश उपाध्‍यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pavaskar) यांच्‍यासह इतरांना अटक करावी, अशी मागणी करत जिल्‍हाभरातून एकवटलेल्‍या अल्पसंख्याक बांधवांनी जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयाबाहेर ठिय्‍या मारत जोरदार घोषणाबाजी केली.

यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांची शिष्‍टमंडळाने भेट घेत त्‍यांच्‍याशी चर्चा केली. चर्चेवेळी शिष्‍टमंडळाने केलेल्या मागणीनुसार पुरवणी जबाब नोंदवून घेण्‍याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केल्‍यानंतर नूरहसन यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्‍यात घेतला.

Pusesawali Riots
Satara News: महापुरुषांचा सोशल मीडियावर अवमान, साताऱ्यातील पुसेसावळी येथे दंगल; हिंसक जमावाने घरे पेटवली

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्‍यानंतर पुसेसावळी येथे जमलेल्या जमावाने प्रार्थनास्‍थळावर हल्‍ला करत अल्पसंख्याक समाजातील युवकांना मारहाण केली. या हल्ल्‍यात नूरहसन शिकलगार यांचा मृत्यू झाला. त्‍यांचा मृतदेह जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयात रात्री आणण्‍यात आला होता. याची माहिती मिळाल्‍यावर सातारा शहरासह परिसरातील अल्पसंख्याक बांधवांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली.

प्रत्‍येकजण झालेल्‍या घटनेविषयी संताप व्‍यक्‍त करत पोलिसांनी या दंगलीमागील मास्‍टरमाईंडचा शोध घेण्‍याची मागणी करत होता. याचठिकाणी नूरहसन याचे आईवडील व इतर कुटुंबीय बसले होते. त्‍यांची भेट घेत प्रत्‍येक जण त्‍यांचे सांत्‍वन करत झालेल्‍या घटनेचा निषेध करत होता.

दुपारी १२ च्‍या सुमारास जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयाबाहेर जिल्‍हाभरातून हजारो अल्पसंख्याक बांधव जमा झाले. जमलेल्‍यांनी या घटनेच्‍या अनुषंगाने यापूर्वीच हल्ल्याची भीती वर्तवल्‍याचे सांगत याला भाजपचे प्रदेश उपाध्‍यक्ष विक्रम पावसकर कारणीभूत असल्‍याचा आरोप केला.

याचवेळी जमलेल्‍यांनी विक्रम पावसकर व इतरांवर गुन्‍हा दाखल होऊन अटकेची कारवाई होईपर्यंत नूरहसन यांचा मृतदेह ताब्‍यात न घेण्‍याचा इशारा दिला. जमाव अधिकच आक्रमक असल्‍याने या परिसरात मोठा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता. याचदरम्‍यान त्‍याठिकाणी विविध सामाजिक, राजकीय, पुरोगामी, परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजर झाले. त्‍यांनी जिल्ह्याच्‍या नावलौकिकास काळिमा फासणारी घटना घडल्‍याचे सांगत निषेध व्‍यक्‍त केला.

याचबरोबर त्‍यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत जमाव जमवणाऱ्यांसह त्‍यांच्‍या राजकीय, धार्मिक पाठीराख्‍यांचा शोध घेण्‍याची मागणी केली. यावेळी त्‍याठिकाणी उपस्‍थित असणाऱ्या वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दाखल गुन्‍हा, सुरू असलेली कारवाई, अटकेत असणारे संशयित व पुढील तपासाची माहिती देत शांततेचे आवाहन केले. मात्र, जमाव ऐकण्‍याच्‍या मन:स्‍थितीत नव्‍हता.

Pusesawali Riots
Pusesawali Riots : साताऱ्याच्या पुसेसावळीत मोठी दंगल; एकाचा मृत्यू, हल्ल्यात 10 जखमी, 200 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?

त्यावर जमलेल्‍यांपैकी दहा जणांचे शिष्‍टमंडळ तयार करून त्‍यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेत त्‍यांच्‍याशी चर्चा करण्‍याचा तोडगा काढण्‍यात आला. यानुसार नूरहसन यांच्‍या कुटुंबातील तसेच जमलेल्‍यांपैकी काहीजण पोलिस मुख्‍यालयात पोलिस अधीक्षक समीर शेख यांना भेटण्‍यासाठी गेले. यावेळी त्‍याठिकाणी जमलेल्‍यांनी विक्रम पावसकरसह राज्‍य सरकारच्‍या कार्यपद्धतीवर टीका करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली.

चर्चेसाठी गेलेल्‍या शिष्‍टमंडळास येण्‍यास वेळ लागत असल्‍याने तणाव वाढतच होता. याचदरम्‍यान त्‍याठिकाणी जमलेल्‍यांनी मृत नूरहसन यांच्‍या आत्‍म्‍यास शांती लाभावी, यासाठी सामुदायिक प्रार्थना केली. दुपारी पावणेदोनच्‍या सुमारास समीर शेख यांना भेटण्‍यासाठी गेलेले शिष्‍टमंडळ वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत जिल्‍हा रुग्‍णालय परिसरात आले. त्‍यांनी जमावास चर्चेतील माहिती सांगत समीर शेख यांनी पुरवणी जबाबात घटनेच्‍या अनुषंगाने संशय व्‍यक्‍त करण्‍यात येणाऱ्या व्‍यक्‍तींवर कारवाई करण्‍याची तसेच त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यास मान्‍यता दिल्‍याची माहिती दिली.

यावर जमावाने विक्रम पावसकर यांना तत्काळ अटक करण्‍याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे तणावात भरच पडली. जमलेला जमाव ऐकण्‍याच्‍या मनःस्थितीत नसल्‍याने तसेच तीव्र शब्‍दात संताप व्‍यक्‍त करत असल्‍याने उपस्‍थित पोलिस अधिकाऱ्यांनी माईकवरून जमावाशी संवाद साधण्‍यास सुरुवात केली. त्‍यांनी आत्तापर्यंत २३ जणांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.

Pusesawali Riots
Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगलीचा भडका उडताच कऱ्हाडात तणावपूर्ण शांतता; मध्यरात्रीच पोलिसांनी घेतली बैठक, मोठा बंदोबस्त तैनात

संशय असणाऱ्या व्‍यक्‍तींच्‍या अनुषंगाने कायदेशीर कार्यवाही सुरू असून, नूरहसन यांच्‍या मृतदेहाची विटंबना थांबण्‍यासाठी तो ताब्‍यात घेत शांततेचे आवाहन केले. या आवाहनानंतरही जमाव शांत होत नसल्‍याने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मध्‍यस्‍थी करण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळीही जमाव अशा घटना यापुढील काळात टाळायच्‍या असतील तर यातील दोषी, त्‍यांच्‍या पाठीराख्‍यांवर कारवाई करणे आवश्‍‍यक असल्‍याची मागणी लावून धरली.

यानंतर अल्पसंख्याक समाजातील मान्‍यवरांनी जमावाची समजूत काढत त्‍यांना पोलिसांना सहकार्य करण्‍याचे आवाहन करत नूरहसन यांचा मृतदेह ताब्‍यात घेण्‍यास संमती दर्शवली. यानुसार पोलिसांनी नूरहसन यांच्‍या नातेवाइकांना शवागाराजवळ नेले. यावेळी जमलेल्‍या जमावाने पुन्‍हा एकदा त्‍याठिकाणाकडे धाव घेत पोलिसांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला.

Pusesawali Riots
Pusesawali Riots : अल्पसंख्याकांची घरं जाळणारा पुसेसावळी दंगलीचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांसमोर मोठं आव्हान

यावेळी पुन्‍हा एकदा जमावाची समजूत घालण्‍यासाठी पोलिसांनी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करावी लागली. दुपारी अडीचच्‍या सुमारास नूरहसन यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्‍यात घेतला. यानंतर मृतदेह असणारी शववाहिका वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांच्‍या देखरेख आणि बंदोबस्‍तात पुसेसावळीकडे मार्गस्‍थ झाली.

Pusesawali Riots
Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगल उसळताच उदयनराजेंनी मध्यरात्री दिली घटनास्थळी भेटी; केलं महत्त्वपूर्ण आवाहन

ती सहन करायचं?

गेल्‍या काही महिन्‍यांपासून जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाला लक्ष्‍य करत ठराविक शक्‍ती समाजात तेढ निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. देश, समाजविघातक प्रवृत्तींना पाठीशी न घालता अल्पसंख्याक समाजाने देशाच्‍या स्‍वातंत्र्यलढ्यासह इतर सर्वच लढ्यात आपले योगदान दिले आहे. मातीशी इमान बाळगणाऱ्या या समाजाला ठराविक हेतूने लक्ष्‍य करण्‍यात येत आहे. दैनंदिन कामकाजात अनेक ठिकाणी तुच्‍छतेची, अपमानास्‍पद वागणूक, वक्‍तव्‍ये करण्‍यात येत असली तरी ती सोसत अल्पसंख्याक समाज जगत आहे. हा त्रास दिवसेंदिवस असह्य होत असून, आणखी किती सहन करायचे, असा सवालही जमलेल्‍यांपैकी अनेकांनी यावेळी उपस्‍थित केला.

कट रचल्याचा आरोप

पुसेसावळी परिसरातील सामाजिक शांतता धोक्‍यात आणण्‍यासाठीचा कट आठ दिवसांपासून रचण्‍यात येत होता. यासाठी काही बैठकाही कऱ्हाड येथील काही जणांनी पुढाकार घेत आयोजित केल्‍या होत्‍या. याबाबतची माहिती अल्पसंख्याक समाजाला देखील समजली होती. आठ दिवसांत यासाठीची मोठी तयारी काही जणांच्‍या देखरेखीखाली सुरू होती, असा आरोपही यावेळी जमलेल्‍या अल्पसंख्याक बांधवांनी केला.

Pusesawali Riots
Pusesawali Violence : पुसेसावळीत दंगलीचा भडका उडताच इंटरनेट सेवा बंद; जाळपोळीनंतर गावात कर्फ्यू, कधी सुरु होणार Internet?

फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

पुसेसावळी येथील घटना संतापदायक असून, त्‍यातून पोलिस प्रशासनाची अकार्यक्षमता दिसून येत आहे. गेल्‍या तीन महिन्‍यांत अशाच प्रकारच्‍या वेगवेगळ्या घटना घडल्‍या असून, त्‍यातील हल्‍लेखोरांवर योग्‍य कारवाई न झाल्‍यानेच पुसेसावळी येथील घटना घडली आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्‍वीकारत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्‍याची मागणी करणारे विविध संघटनांचे संयुक्‍त निवेदन रजनी पवार, ॲड. शैला जाधव, आरिफ शेख, मिनाज सय्‍यद, विजय मांडके यांच्‍यासह अनेकांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयास दिले आहे.

अफवांवर विश्‍वास ठेऊ नका, सामाजिक सलोखा राखावा - सुनील फुलारी

पुसेसावळी (ता. खटाव) येथील कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलिस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे २३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.