साताऱ्यातील ज्वारी, हरभरा राज्यात प्रथम

State Level Crop Competition
State Level Crop Competitionesakal
Updated on

काशीळ (सातारा) : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय पीक स्पर्धेत (State Level Crop Competition) भरीव यश संपादन केले आहे. साहेबराव मन्याबा चिकणे यांनी रब्बी ज्वारी, तर (कै.) वसंत पांडूरंग कचरे यांनी रब्बी हरभऱ्याचे विक्रमी उत्पन्न मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यभरात घेतल्या गेलेल्या रब्बी हंगाम २०२० पीक स्पर्धेचे (Rabi Season 2020 Crop Competition) निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. या निकालात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. (Rabi Season 2020 Crop Competition Farmers From Satara District Win State Level Crop Competition)

Summary

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय पीक स्पर्धेत भरीव यश संपादन केले आहे.

यामध्ये सोनगाव (ता. जावळी) येथील साहेबराव चिकणे यांनी रब्बी ज्वारीचे हेक्टरी १०१ क्विंटल उत्पन्न घेत राज्यात प्रथम, तर वरखडेवाडी (ता. वाई) येथील नितीन बाजीराव वरखडे यांनी हेक्टरी ९० क्विंटल उत्पन्न घेत तृतीय क्रमांक मिळवला आहे. काटेवाडी (ता. खटाव) येथील (कै.) वसंत पांडूरंग कचरे यांनी रब्बी हरभऱ्याचे हेक्टरी ६३ क्विंटल दहा किलो उत्पन्न मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटाकवला आहे. विभागस्तरावर सदाशिव रघुनाथ मालुसरे, गुंडेवाडी (ता. वाई) यांनी रब्बी ज्वारीचे हेक्टरी ८७ क्विंटल १३ किलो उत्पन्नासह प्रथम, विष्णू जगन्नाथ मांडके गुरसाळे (ता. खटाव) यांनी हेक्टरी ६५ क्विंटल १३ किलोसह व्दितीय क्रमांक मिळवला आहे. गहू पिकात विभागस्तरावर अनंत हणमंत माने, रहिमतपूर (ता. कोरेगाव) यांनी हेक्टरी ७६ क्विंटल सात किलोसह प्रथम, तर सौरभ विनयकुमार कोकिळ, धामणेर (ता. कोरेगाव) यांनी ७२ क्विंटल ५० किलो उत्पन्नासह व्दितीय क्रमांक मिळाला. हरभरा पिकात विभागस्तरावर आनंदराव उत्तमराव घाडगे, पळसगाव (ता. खटाव) यांनी हेक्टरी ४६ क्विंटल दहा किलो प्रथम, तर भानुदास किसन जाधव, गुरसाळे (ता. खटाव) यांनी हेक्टरी ४५ क्विंटल ७० किलोसह व्दितीय क्रमांक मिळवला आहे.

State Level Crop Competition
'जरंडेश्वर जप्तीबाबत शासनानं फेरविचार करावा, अन्यथा रस्त्यावर उतरू'

जिल्हास्तरावर रब्बी ज्वारीमध्ये चंद्रभांगा मारूती निकम, न्हावी बुद्रुक (ता. कोरेगाव) यांनी हेक्टरी ५८ क्विंटल ७० किलो उत्पन्नासह प्रथम व रामचंद्र निवृत्ती शिंगटे, मर्ढे (ता. सातारा) यांनी हेक्टरी ५८ क्विंटल १७ किलो उत्पन्नासह व्दितीय क्रमांक मिळवला. रब्बी ज्वारीमध्ये राजेंद्र मोहनराव चव्हाण, कुंभारगाव (ता. पाटण) यांनी हेक्टरी ५६ क्विंटल ७५ किलोसह तृतीय क्रमांक मिळवला. गहू पिकात संजय माणिक पवार, सरडे (ता. फलटण) यांनी हेक्टरी ७१ क्विंटल दहा किलोसह प्रथम, चांगदेव शंकरराव यादव, सोळशी (ता. कोरेगाव) यांनी 69 क्विंटल 30 किलोसह व्दितीय व शैलश माणिक पवार सरडे (ता. फलटण) यांनी 68 क्विंटल 88 किलोसह तृतीय क्रमांक मिळवला. जिल्हास्तरीय हरभरा पिकांत शंकर नारायण पाचांगणे, मंगळापूर (ता. कोरेगाव) यांनी हेक्टरी 40 क्विंटल 50 किलोसह प्रथम, विक्रम आनंदराव जाधव चिमणगाव (ता. कोरेगाव) यांनी हेक्टरी 32 क्विंटल उत्पन्नासह व्दितीय तर धनंजय गुलाबराव जगदाळे, कुमठे (ता. कोरेगाव) यांनी हेक्टरी 30 क्विंटल 35 किलोसह तृतीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरूदत्त काळे, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी अभिनंदन केले.

Rabi Season 2020 Crop Competition Farmers From Satara District Win State Level Crop Competition

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.