रहिमतपूरसह परिसरातील अनेक गावांतील खेळाडूंची चांगली सोय होणार आहे.
कऱ्हाड (सातारा): रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील नगरपालिकेस क्रिडासंकुल बांधण्यासाठी सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
रहिमतपूर येथे आतापर्यंत प्रतिकूल परिस्थिती अनेक मल्ल, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले आहेत. या शहरामधील (कै.) बाबूराव काशीद- चव्हाण यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे, तसेच देशाचे नावलौकिक केलेले आहे. आता या शहरामध्ये नवीन प्रकारच्या व्यायामाच्या सोईसुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे अनेक नवोदित खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे. क्रीडासुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य या योजनेंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे रहिमतपूरसह परिसरातील अनेक गावांतील खेळाडूंची चांगली सोय होणार आहे.
क्रीडा संकुलासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, रहिमतपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणी केली होती. निधी उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सहकार्य केल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.